दैनंदीन जीवनात प्रत्येकजण सुख प्राप्ती साठी सुचतील तसे प्रयत्न करीत असतो. परंतू अखिल ब्रह्माण्डामध्ये अनेकविध स्तरांतील अनेकविध समस्यांत अडकलेला मानवी जीव कसा अकार्यक्षम होतो, व्यक्तिगत व सामाजिक जीवनात अपेक्षित पातळी गाठण्यात तो कमी कां पडतो, आणि त्यातून कसा बाहेर येउ शकतो हे न समजल्यामुळे सरते शेवटी त्याला प्रश्न पडतो की मी काय करु?, सुख, शांती कशी मिळेल? आजच्या युगामध्ये असे दिशाहीन झालेले जीवन योग्य दिशेने वाटचाल कशी करू शकेल? मनातील अस्थिरता, अस्वस्थता व गोंधळ जाऊन मन स्थीर कसे होऊ शकेल? या सर्वांचा उलगडा येथे होईल.