अध्यात्माची प्रत्येकालाच गरज!

 

प्राप्त परिस्थितीत जीवन व्यतीत करत असताना मनुष्याच्या मनावर होणार्‍या प्रचंड नकारात्मक आघातांमुळे तो मनःशांती हरवून बसतो. मनुष्य स्वतः स्वतःचा सुख व शांतीचे उगमकेंद्र आहे याचा त्याला विसर पडू लगतो. अशा परिस्थितीत मनःशांतीची पुनर्स्थापना करण्यासाठी आध्यात्मिक जीवन पध्दतीची गरज पडते.

अध्यात्म ही मूलतः एक जीवन शैली आहे .ज्याने मनुष्याचा सर्वांगीण विकास होतो. आत्मिक विकासाचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या संसारिक व व्यावहारिक जीवनातही पडतो व त्यायोगे श्रीनाथशक्तिपीठातून व्यक्ति व्यक्ति करीत समाज परिवर्तन घडवल्या जाते.

अध्यात्म ही कल्पना नव्हे! मानवाच्या इन्द्रियांना व जीवन पद्धतीला विशिष्ट शिकवणूक देणे गरजेचे आहे. अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्माची प्रत्येकाला असलेली गरज? अध्यात्म कसे अंगीकारावे? अध्यात्मातून आत्मिक उन्नती, अध्यात्माचा संसार, व्यवहार यांच्याशी असलेला संबंध, व अध्यात्मातूनच स्वत:ला निर्भय, बलशाली, विवेकी कसे बनवावे? या संबंधीचे संपूर्ण मार्गदर्शन श्रीनाथशक्तिपीठ अकोला येथून प.पू. श्री नरेन्द्रनाथ महाराज सततच करत असतात. श्रीनाथशक्तिपीठातून समाजाच्या पुनरुत्थानाचे हे कार्य सातत्याने चालू आहे.