अपमृत्यू तथा शत्रुंपासून संरक्षण

 

दीर्घायुरारोग्य देणे, मृत्यू, अपमृत्यूवर विजय मिळविणे, हे या पंथीयांना सहज साध्य आहे. शत्रू, गुप्तशत्रू, हितशत्रू, मित्ररुपशत्रू, व्यावसायिक शत्रू, ज्ञात अज्ञात असलेले, दूरुन त्रास देत असलेल्या सर्वच प्रकारच्या शत्रूंचे निवारण तसेच तंत्र, मंत्र, जारण, मारण, परविद्या, आदिंचा उपयोग करुन जे त्रास देतात त्यांच्यावर प्रभावी उपाय हा पंथ करु शकतो. सर्व तर्‍हेच्या कर्मामध्ये, विद्यार्जनामध्ये जर कोणी बाधा निर्माण करत असेल तर त्यापासून नाथ पंथीय हे निवृत्ती देउ शकतात.

पितृ दोष काढणे तथा जीवनात सर्वोंन्नती साधणे

सर्वप्रकारच्या व्यावहारिक, व्यावसायिक तथा आध्यात्मिक उन्नतीतील विघ्ने निवारण करण्याचे प्रयत्न श्रीनाथशक्तिपीठातून सहजतेने केले जातात. मनस्थैर्य, सामाजिक स्थैर्य, जीवनस्थैर्य, आध्यात्मिक उन्नती साध्यकरणे, आणि आपल्या कुला मध्ये कोणत्याही प्रकारचे दोष निर्माण झाले असतील वा कोणी बाधा निर्माण केली असेल तर त्या पासुन सुटका पावणे या संबंधीचे संपूर्ण मार्गदर्शन व उपाय योजना श्रीनाथशक्तिपीठातून केल्या जाते.

सर्व प्रकारचे पितृदोष, कालसर्पदोष, ग्रहग्रहणदोष, चांडालदोष, हरतर्‍हेचे वास्तुदोष वा अन्य कोणत्याही प्रकारचे दोष नाथपंथीय दूर सारु शकतात. विवाहादि मंगलकार्य तथा यश, कीर्ति, विपूल धनधान्य हा पंथ साधकाला देउ शकतो. घरात व समाजात परस्पर मतैक्य, सुसंवाद, मैत्रीप्रवण संबधश्रीनाथशक्तिपीठातील उपायांनी सहजच प्रस्थापीत करता येतात.

अशा प्रकारे दैनंदिन जीवन सुखावह करण्यासाठी, जीवनात येणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी उपाय योजना, आणि ह्या वैदिक पध्दतीने उपचार ह्या केन्द्रा मधून केले जातात.

भाग्याचे परिर्वतन करण्यासाठी उपाय.

विविध कर्माच्या माध्यमातून कर्म सिद्धांताच्या आधारे कर्म करवून जीवनातील प्रश्न सोडविण्याचे कार्य येथून होते. विविध समस्यांचा विचार करुन अपेक्षित फलश्रुती कशी मिळेल, नेमके कर्म कसे करावे याचे नियोजन येथे केले जाते. श्रीनाथशक्तिपीठ हे नाथ पंथाच्या आध्यात्मिक शक्तिंचे केन्द्र स्थान आहे. नाथ पंथाची संपूर्ण सत्ता मानवी जीवन, त्रिविध ताप, जन्म-मृत्यू, व चरा-चरांवर आहे त्यामुळे हे कर्म फक्त नाथशक्तिपीठ, अकोला येथेच होतात व अन्यत्र होत नाहीत. कर्माला लागणारे विधान, मंत्रसमुच्चय, कारिका संकल्प आदीप. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाख़ाली श्रीनाथशक्तिपीठानेच तयार केले आहेत. हे तयार करतांना विविध समस्यांचा विचार करुन मंत्रांची योजना केली आहे. असंख्य लोकांचे सुख, दुःख, पीडा, लक्षात घेउन या कर्माचे विधान केले आहे. ह्या योजनेला नाथपंथाचे परंपरागत आशीर्वाद प्राप्त आहेत.