अपारंपरिक शिक्षण पध्दती

 

साधारणतः सर्वसामान्यांना ज्ञात शिक्षण पध्दती म्हणजे शाळा कॉलेजातील शिक्षण. परंतु या शिक्षण पध्द्ती ने शिकवल्या जाणारे ज्ञान जरी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांमध्ये संक्रमीत होत असले तरी व्यक्तिगत जीवनातील ध्येय, मानसिक स्थैर्य, धाडस आत्मविश्वास व या सारखे इतर गुणग्रहण शक्य होत नाही. गुण ग्रहणासाठी सर्वोत्तम पध्दती ही की, ज्यांचे गुण आपल्यास संक्रमीत करुन घ्यावयाचे असतील, जसे की— छ्त्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी या सारख्या राष्ट्रीय व्यक्तींच्या गुण ग्रहणासाठी त्यांच्या चारित्र्याचा कर्तृत्वाचा अभ्यास करुन त्याची विचारसरणी आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे ही होय.

प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराज म्हणतात, “अभ्यास साधना व चिंतनाव्दारे युग पुरुष, ऋषीमुनी, युग प्रवर्तक, अवतारी पुरुषाचे गुण ग्रहण करणे व त्याव्दारे व्यक्तिमत्व घडवणे म्हणजेच अपारंपरिक शिक्षण पध्दती”.

मारुती, गणपती, शंकर, भगवान दत्तात्रय आदि देवता आहेत असा दृष्टिकोन मानव जातीने ठेवला परंतु ह्या पैकी कुणीच स्वतः ला देव समजले नाही अथवा आपली ओळख देव म्हणून दिली नाही. त्यांच्या देवासमान सामर्थ्याची अनुभूती सदैव इतर लोक घेत आले आणि म्हणूनच जन समुदायानी त्याना युग प्रवर्तक, युग पुरुष, एक आदर्श चारित्र्य संपन्न अनुकरणीय सत्पुरुष असे न समजता त्यांचे गुणग्रहण न करता, त्यांना देव संबोधुन बाजुला ठेवले. समाज एवढ्यावरच थांबला नाही, तर ह्या आदर्शांचे गुणगान करणार्‍या आणि त्यांच्या गुण वैशिष्ट्यांची अभिलाषा करणार्‍यांना अंधश्रध्द म्हणून हिणवू लागला.

ॐ शिक्षण मंडळाच्या माध्यामातुन समाजामध्ये अवतारी पुरुष, युग पुरुष यांच्या चरित्रावरुन त्यांचे गुण ग्रहण कसे करावे, तसेच आपल्याला जे गुण आपल्यात पहिजे त्यांची निर्मिती कशी करावी, त्यांची जोपासना कशी करावी ह्याचे अनुभव सिद्ध मार्गदर्शन करुन व्यक्तिमत्व घडविण्याचे कार्य केले जाते. हे शिक्षण येथून अपारंपरिक पध्दतीने प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाख़ाली देण्यात येते.