नव ग्रहांची उपासना

 

तीथी, वार, नक्षत्र यांचा परस्परयोग तथा अग्नीचा या सर्वांशी कसा योग आहे. हे पाहूनच विशिष्ट नक्षत्राला हा उपचार केला जातो. जीवनातील विविध अडसर दूर करण्यासाठी हा उपाय आहे. ज्या कर्म दोषांनी जीवनामध्ये अतिशय धक्कादायक किंवा क्लेशदायक घटना घडतात, ते कर्मदोष दूर करण्यासाठी ह्या उपचाराची गरज आहे. हा उपचार धर्म, जाती निरपेक्ष असून कोणत्याही धर्म किंवा जातीतल्या व्यक्तिला हा उपचार करता येईल. कर्मदोषांचा संबध हा धर्म किंवा जातीशी, भोवतालच्या परिस्थितीशी, सामाजिक पध्दतीशी, संबधीत नसून तो केवळ त्याच्या पिंडाशी, कर्माशी, व स्थितीशी संबधीत आहे त्यामुळे हा उपचार मानव जातीतील कोणत्याही धर्माच्या मानवासाठी केल्या जाऊ शकतो.

या उपचारानंतर मनातील उत्साह प्रचंड वाढलेला असतो. आपले सर्व तर्‍हेचे योग बदलु लागले आहेत असे आंतरिक मन सांगु लागते, तशी अनुभूती येउ लागते व भाग्यात परिवर्तन घडु लागते.