यज्ञ संस्कार

 

व्यक्तिगत व कौटुंबिक समस्यांसाठी हा संस्कार करतात. याचा संकल्प हा ज्याचा त्यानेच करावा लागतो. परंतु ज्या ठिकाणी आई वडील हेच अज्ञान पाल्याचे पालनकर्ते असतात, तेथे पाल्याच्या वतीने तेही उपचार करु शकतात. मात्र फळ संकल्पाप्रमाणे ज्याचे त्यालाच मिळते. जेथे कुटुंब सहभागी होते, तेथे ते फळ उपचार करणार्‍याला व कुटुंबातील सर्वांना मिळू शकते.

हा कार्यक्रम यजमानाच्या घरी, अथवा त्याच्या इच्छेनुरुप इतरत्र कोठेही किंवा श्रीनाथशक्तीपीठ येथेच केला जातो. हा संपूर्ण कार्यक्रम यजमानातर्फे व यजमानाच्या इच्छेप्रमाणे होतो. यजमानाच्या ज्या समस्स्या, असाध्य प्रश्न, किंवा इच्छा असतील किंवा ज्यांचा त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला विशेष त्रास होतो अशा कोणत्याही कारणासाठी हा उपचार केला जातो. घरात अस्थिरता व अशांतता असेल, पती पत्नीमध्ये अती वाद-विवाद होत असतील, पतीपत्नीमध्ये विकोपाचे मतमतांतर असतील, जीवनात दुःख अस्थीरता व एकमेकांबद्दलचा कलुषितपणा वाढत असेल तर तो घालविण्यासाठी ही योजना केली जाते.

या उपाय योजनेनंतर ज्या संकल्पाने हा उपचार करण्यात आला होता त्याची पूर्तता होऊ लागल्याची जाणीव यजमानास होतेव. अडचणींचा डोंगर हलका होऊ लागतो. सुसंवाद वाढू लागतो व शांतता व स्थिरतेचा अनुभव येउ लागतो.