श्री विष्णूची उपासना

 

जन्मदत्त, अनुवंशिक, दीर्घकालीन, अकारण उद्भवलेल्या प्राकृतिक दोषांचे निराकरण करण्याकरीता, तसेच वंश परंपरागत आलेल्या रोगांसाठी, गंभीर रोगांसाठी, प्रकृती अस्वास्थ्यासाठी, गतजन्मीच्या कुयोगामुळे, सद्यजीवनामध्ये, शरीरस्वास्थ्याला होणारा त्रास दूर करण्यासाठी या उपचाराचे प्रयोजन केलेले आहे. जे अनुवंशिक रोग आहेत, दीर्घकाळ टिकणारे रोग आहेत, काहीही कारण नसतांना आपल्या पाठीमागे लागलेले रोग आहेत, त्यासाठी ही योजना श्रीनाथशक्तिपीठाने केलेली आहे. जन्मतःच शरीरामध्ये निर्माण झालेली व्याधी, तसेच कर्माच्या अभावी निर्माण झालेले व्यंग वा दोष, जीवनातील अनुत्साह, तसेच नकारात्मक विचार काढण्यासाठी या उपचारांचे प्रयोजन आहे.

बुध्दिमत्तेचा विकास कमी असणे, मनामध्ये निरुत्साह असणे, शिक्षणामध्ये विविध प्रकारच्या अडचणी येणे, ऐन परीक्षेच्या वेळी आजारी पडणे, झोप जास्त येणे आणि त्याच्यावर नियंत्रण नसणे, तसेच अयोग्य पध्दतीने निर्माण होणार्‍या शारीरिक पीडा, तसेच अन्य प्रश्न याच पूजेच्या माध्यमातून हाताळले जातात. चिडचिडा स्वभाव, स्वभावाची अस्थिरता, मनाची अशांतता घालविण्यासाठी हे उपचार श्रीनाथशक्तिपीठात होतात. करणी, बाधा आदी प्रकारांनी त्रस्त असलेल्या जीवासाठी नाथशक्तिपीठाने विशेष योजना केली आहे. या पूजेचा परिणाम सर्वांगिण विकासासाठी आहे.

आजच्या चढाओढीच्या युगामध्ये विविध स्पर्धांमध्ये टिकून राहण्यासाठी किंवा अग्रेसर राहण्यासाठी देखील हे उपचार केले जातात. आर्थिक विवंचना, ॠण आदी संबधीचे प्रश्न, अकारण असलेले वैमनस्य या उपचारांनी दूर केल्या जातात. जीवनातील अनेक प्रकारचे कुयोग ज्यामुळे दैनंदिन जीवन अशांत होउन दिशाहीन झालेले आहे, बहुतांश दिवसाचा वेळ हा विवंचनेत किंवा निराश मानसिक अवस्थेत जात आहे, अश्या वेळी देखील ही योजना केली जाते.

ह्या उपचारांमुळे परयंत्र, परमंत्र, परतंत्र आदी गोष्टींमुळे, भूतप्रेताच्या भय आदी व्यथा नष्ट होउन जारण मारण विघ्नांपासून संरक्षण मिळते.

हा प्रयोग प्रातिनिधिक स्वरुपाने करता येत नाही. याची योजना ज्याचेवर उपचार करावयाचे आहेत त्याच्यासाठीच आहे. याचा प्रत्यक्ष परिणाम हे कर्म करणार्‍यावरच होतो व इतर कोणालाही ह्याचा प्रत्यक्ष फायदा होत नाही.