जन्मतः येणारे दोष

 

प्रत्येक माणसाच्या जीवनात, त्याच्या जन्मा बरोबरच पिंड दोष येतात. हे पिंड दोष म्हणजेच मागिल जन्माच्या कर्मांचे फलीत. आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक अशा प्रकारचे असतात. ह्यांनाच त्रिविध ताप असेही म्हणतात. नाथपंथाच्या सिध्दतेनुसार ते सहजतेने घालविता येतात. जन्मतः कुंडलीतील हरतर्‍हेचे ग्रहदोष, अरिष्ट, तीथी, वार, नक्षत्रदोष वा अन्य प्रकारचे दोष, प्रत्यक्षपणे जीवनात भोगत असलेले हरतर्‍हेचे दोष घालविण्याचे सामर्थ्य ह्या पंथात आहे. शरीरात उत्पन्न झालेले साध्य-असाध्य रोग, पीडा, आदी घालविण्याचे सामर्थ्य या पंथात आहे.