वैश्विक परिषद – या! आपले स्वागत आहे.

 

” वैश्विक परिषद”

।।सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च।।

“सूर्य विश्वाचा आत्मा”
ॠग्वेद_१_११५

*माहिती पुस्तिका*

‘”सूर्य विश्वाचा आत्मा” ,या संकल्पनेवर आधारित वैश्विक परिषदेत अकोला नाथशक्तिपीठ’, आपल्या स्वागतासाठी उत्सुक आहे. भारतात महाराष्ट्रातील अकोला येथे दिनांक १२ जानेवारी ते १६ जानेवारी २०१७ या कालावधीत वैश्विक परिषद संपन्न होईल.

सूर्योपासनेचा देदिप्यमान प्रभाव आणि परिणामाच्या संशोधनात रुचि घेउन ज्ञान प्राप्त केलेल्या ज्ञानोपासकांना ही वैश्विक परिषद पर्वणीच ठरणार आहे.

विद्यापीठ, संस्था आणि वैयक्तिक पातळीवर आपण परिषदेत सहभाग नोंदवू शकता.

परिषदेच्या निमित्ताने आपणास विश्वस्तरावरील महान वैज्ञानिक, संशोधक,आध्यात्मिक विभूति आणि अभ्यासू वैदिकांशी व प्राध्यापकांशी आपल्या ज्ञानाची देवाण—घेवाण करण्याची सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे.आपल्या या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण आपल्या सहकारी वृदांसह नोंदणी करण्याची त्वरा करा.

आपल्या स्वागताच्या प्रतीक्षेत— आयोजन समिती.