वैश्विक परिषदेचे आयोजक

 

चैतन्य श्री मच्छिंद्रनाथ हे नवनाथ परंपरेतील पहिले गुरु आहेत,तर योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराज हे या अखंड गुरु परंपरेतील १५ वे नाथ आहेत. त्यांच्या आज्ञेनुसार त्यांचे उत्तराधिकारी प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराज यांनी अकोला येथे ओम
एज्युकेशन सोसायटी अंतर्गत श्रीनाथशक्तिपीठाची स्थापना केली. ओम एज्युकेशन सोसायटी ही बाॅम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५० खाली दिनांक ८ डिसेंबर १९८८ रोजी पंजीकृत झाली. F/१९९१ हा संस्थेचा पंजीयन क्रमांक आहे. संस्थेतील आर्थिक व्यवहारास ८० —जी हे कलम लागु आहे.

नाथशक्तिपीठाधीश प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या कृपा मार्गदर्शनात श्रीनाथशक्तिपीठाने आजवर अनेक सूर्यपंचायतन याग संपन्न केले आहेत.वैदिक व नाथ पंथीय ज्ञानच्या प्रसारासाठी अखिल भारतवर्षात भ्रमण केले.

विश्वातील समस्त मानवांच्या आत्मविश्वासात ,त्यांच्या कार्यक्षमतेत वृध्दी व्हावी.मानसिक शांतीचा त्यास लाभ व्हावा व तो वैयक्तिक तसेच कौंटुबिक स्तरावर संपन्न व्हावा हा या मागील उद्देश आहे.

श्रीनाथशक्तिपीठाने आजवर योगेश्वर कृष्णाच्या श्रीमद्भगवद्गीतेतील कर्म सिध्दांताच्या आधारे हजारोंना मार्गदर्शन केले आहे.
आमच्या या कार्याची श्रृंगेरी पीठाचे प.पू. शंकराचार्य श्री भारतीतीर्थ महास्वामीजी,प.पू.शंकराचार्य स्वामी महाराज कांचीकामकोटी पीठ, प.पू. शंकराचार्य स्वामी महाराज, करवीर पीठ, प. पू. शंकराचार्य स्वामी महाराज हंम्पीपीठ, यांनी प्रशंसा केली आहे.