वैश्विक परिषदेचे स्थळ

 

वैश्विक परिषदेचे स्थळ ‘श्रीनाथशक्तिपीठ, खरप रोड, न्यू तापडीया नगराजवळ अकोला हे राहिल.
ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली आहे त्याच विधात्यांनी नाथपंथाचे निर्माण केले आहे. अशा या पंथाचा आध्यात्मिक वारसा नाथशक्तिपीठास लाभला आहे. नाथशक्तिपीठाच्या स्थापने पासूनच पीठास नाथपंथाच्या अखंड गुरु परंपरेची कृपा व आशीर्वाद प्राप्त झाले आहेत. नाथशक्तिपीठ हे आध्यात्मिक अनुभूतीचे केंद्र आहे. गेल्या २४ वर्षांपासून येथे आध्यात्मिक विज्ञानवर आधारित अनुसंधान व प्रयोग केल्या जात आहेत.

सूर्य उपासना ही नाथपंथाचे अधिष्ठान आहे.पाया आहे.या वैश्विक परिषदेचा विषय आध्यात्मिक असाच म्हणजे सूर्योपासनेचाच आहे.

श्रीनाथशक्तिपीठ हे अकोला रेल्वे स्थानकापासून व बस स्थानकापासून ३ कि. मी. तर विमानतळापासून ५ कि.मी. अंतरावर आहे. नाथशक्तिपीठात पोहचण्यासाठी आपल्याला सर्व प्रकारची म्हणज अॅटोे रीक्षा, टॅक्सी सहज उपलब्ध आहेत.पीठाच्या परिसरात आपणास वाय-फाय कनेक्शन इत्यादी सवलती सहज उपलब्ध आहेत.

अकोला हे नागपूर — मुंबईला जोडणार्‍या मध्य रेल्वेच्या मार्गावरील व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील जिल्ह्याचे ठिकाण असून शहराची लोकसंख्या २० लाखांच्या घरात पोहचते. येथील शिवणी विमानतळ हे नियमीत उड्डासाठी झपाट्याने विकसीत होत आहे. २०१६च्या मध्यात ते परिपूर्ण झालेले असेल. अकोल्याचे हवामान हे उष्ण असून येथील तापमान हे ३२ ते ४० अंशा पर्यंत असते. मात्र डिसेंबर जानेवारीचे दरम्यान येथील वातावरण हे अत्यंत प्रसन्न असते. या दरम्यान
तापमानही ८ ते २३ अंशा पर्यंत असते.