वैदिक संशोधन

 

वेदांमधील ज्ञानाचे व तत्त्वांचे असिमीत भंडार सर्व सामान्य मनुष्यासाठी खुले व्हावे, मनुष्याचे जीवन सुखमय व समृध्द व्हावे व या ज्ञानाचा योग्य वापर करता यावा यासाठी या संस्थतुन अहोरात्र प्रयत्न केले जातात. या सृष्टीत कोणतेही चमत्कार घडत नसतात. अशा सर्व अघटित घटनांमागे वेद विज्ञानाचे तत्त्वच कार्यरत असतात व म्हणूनच या वरील संशोधनात्मक अभ्यासाची नितांत गरज आहे.

वेदांमधील मंत्र, तंत्र स्वरूपी ज्ञानाचा मनुष्याच्या जीवनातील विविध अडचणींवर मात करण्यासाठी मनुष्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच त्याचे ईप्सित साध्य करण्यासाठी कसा उपयोग करता येइल. कोणते मंत्र कसे केव्हा व कुठे वापरावेत, मंत्र सिद्ध करण्याच्या पद्धती इत्यादी संबंधीचा सप्रयोग, अनुभवसिद्ध संशोधनात्माक अभ्यास प. पू. श्री नरेन्द्रनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाखाली येथे केल्या जातो.