वैदिक संशोधन

वेद विज्ञान

आजच्या युगात नोंदणीकृत प्रयोगांचे परीक्षण सिद्ध फलीत म्हणजे विज्ञान होय. वेदांमधील अनेक प्रयोग हे आजच्या प्रगत समजल्या जाणार्‍या भौतिक विज्ञानालाही अगम्य आहे. परकाया प्रवेश, एकाच वेळी अनेक ठिकाणी उपस्थिती, संजीवन विद्येच्या सहाय्याने मृतास पुनर्जीवीत करणे या व अशा अनेक प्रयोगांबद्दल आपल्याला महाभारत, रामायण, पुराणे यामधून माहिती मिळ्ते.

आजवर वेदशस्त्रांचा प्रामुख्याने मनुष्य, वनस्पती इतर जीव यांच्यावर होणार्‍या परिणामा बाबतच संशोधन झाले आहे. हे जगमान्य आहे की भौतिक शास्त्राच्या व रसायन शास्त्राच्या परीक्षणाच्या पध्दती व जीव सृष्टीशी संबंधीत परीक्षणाच्या पध्दती या मध्ये महद अंतर असते. त्याच प्रमाणे प्रत्येक जीवाच्या प्रकार, स्वभाव व दोषांप्रमाणे केलेल्या प्रयोगांच्या फलीतामध्ये अंतर असते.

वेदांच्या शास्त्रीय ज्ञानाचे उत्तम उदाहरण म्हणजे जगमान्य असलेले आयुर्वेद शास्त्र होय, ज्याची उत्पत्ती अथर्ववेदातून झाली आहे. असे हे वेद सर्वव्यापी विज्ञान आहेत.

mrMarathi