May 042017
 

ध्यानी परब्रह्म रूप निराकार ।।
वाणी नामोच्चार क्षणोक्षणी ।।

आत्मसुख चिन्मयानंद मेळा ।।
जीवनसोहळा रंगलासे ।।

नाथ नारायण कर तये माथी ।।
केशव सांगाती ठायी ठायी ।।

चित्ती अवघेचि सुख परिमळ ।।
व्यापिले तात्काळ गुरुराये ।।

गुरुराव सृष्टी गुरुराव चित्ती ।।
गुरुचरणी मुक्ती पावतसे ।।

🙏🏼🙏🏼🙏🏼श्री .पराग देशपांडे
बंगलोर