May 112017
 
2015 साली दिल्ली ला असतांना काकांचे अचानक एअरपोर्ट वर दर्शन घडले. भेट तशी 10 ते 15 मीनिटांचीच होती पण खूप स्फूर्ती आनंद आणि समाधान देणारी होती.

काका, बद्रीनाथ, केदारनाथ आणि पशुपतीनाथ ची यात्रा करून दिल्ली ला आले होते व त्यांना सकाळी 10.30 ची नागपूर साठी परतीची flight घ्यायची होती. मला सकाळी 7 च्या सुमारास काका दिल्ली ला असल्याचे कळले. मी त्यांच्या सोबत कॉल वर बोललो व तसाच त्यांच्या एका दर्शनासाठी अंघोळ करून, सर्व आवरून एअरपोर्ट कडे निघालो. माझ्या room पासून एअरपोर्ट तसे बरेच लांब होते. साधारण 1 ते 1.30 तास लागणार होता.

सर्व काही अचानक होत असल्याने काही सुचत नव्हते, कसेही करून आपण वेळेत पोहचावे आणि काकांचे दर्शन व्हावे असे वाटत होते. त्यामुळे रस्त्याने जातांनाच हार फुल पेढे घ्यावे असे ठरवले. पण सकाळ चा वेळ असल्याने एअरपोर्ट च्या रस्त्यावर काहीही मिळाले नाही.

एअरपोर्ट ला मी तसा काकांच्या कृपेने लौकर पोहचलो. काकांना एअरपोर्ट ला पोहचायला 10 ते 15 मिनिटं होते. सद्गुरुंचे दर्शन, तेही जेव्हा सद्गुरू बद्रीनाथ यात्रेवरून परत येत असतांना हा तर खूपच मोठा योग होता. पण माझ्या जवळ त्यांच्या स्वागतासाठी एकही फुल नव्हते की त्यांच्या साठी पेढे नव्हते. मनाला फार रुख रुख लागली. पण सद्गुरुंना आपली रुख रुख समजणार नाही असे कधी होईल का ? शेवटी अंतर्मनात तर तेच आहेत ना ! मी प्रयत्न केला, गार्ड ला विचारले इथे जवळपास कुठे हाराचे दुकान आहे का ? पण एअरपोर्ट परिसरात हाराचे दुकान असणे शक्यच नव्हते. मग माझ्या लक्षात आले, की एअरपोर्ट परिसरात फुल झाड नक्कीच असतात, आणि तसाच मी बगीचा शोधायला लागलो. छान लाल फुलझाडे असलेला बगीचा मला दिसला. तसेच मी काही ताजी फुलं गोळा केली.

“इतर वेळी उगाच आयुष्य संपवून ती फुलं जमिनीवर गळून पडली असती, पण आज त्या फुलांचं आयुष्य सद्गुरूंच्या चरणावर समर्पित होणार होत, काय नशीबवान म्हणायची ती फुलं !!”

तसच मला तिथं काही दुकानं दिसलेत, काकांसाठी पेढे मिळतात का म्हणून मी तिथे गेलो. पण त्यातील एकही दुकान मिठाईचे नव्हते. मी तेथील एक दुकानाची जागा मात्र check केली नाही, मला वाटलं ते तरी कशाला मिठाई चे दुकान असेल. पण मग मनात विचार आला एकदा चेक करायला काय हरकत आहे, म्हणून मी तिथे गेलो, तर पाहतो तर काय, तेच एक दुकान तिथे मिठाई चे होते. माझ्या मनात खूप दिवसांची काकांसाठी दिल्लीची फेमस “डोड्डा बर्फी” नेण्याची इच्छा होती. ती इच्छा माझी त्या दिवशी पूर्ण झाली.

गुरुमाऊलींनी माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. काकांचे छान दर्शन झाले. एअरपोर्ट वर शिरसाष्टांग दंडवत मी काकांसमोर घातले. काकांच्या पायावर डोकं ठेवलं की जो 3 4 सेकंद चा वेळ असेल कदाचित तोच जिवंतपणी “मुक्ती” चा अनुभव आहे.

अचानक घडलेल्या दर्शनाचा उत्साह आनंद एवढा होता की सहज खालील काही ओळी स्फुरल्या:

आजी सोनियाचा दीन !
स्वरूपासी मिसळे प्राण !!

चातकासी वर्षा बिंदू !
तैसे जीवा कृपासींधू !!
नयनी अवघे पंचप्राण !
नाथ रंगी लीन मन !!

तूटती ममत्वाचे बंध !
जीवनपुष्पा भक्ती गंध !!
सद्चिदानंदी लागे ध्यान !
अंती श्वास चरणी लीन !!

जये पाहता दिसे दीगंबर !
आनंदसागरी स्वये चक्रधर !!
चैतन्याचे ऐसे रूप सगुण !!
देखीले ते ध्यान श्रीनाथ रमण !!

– पराग देशपांडे,
बंगलोर.

फोटो: सद्गुरुनाथांचे दिल्ली एअरपोर्ट वरील दर्शन व त्यांच्या चरण कमलांवर समर्पित झालेली ती नशीबवान फुलं.

Khupch chan anubhav hota
 1


Source: प पु नरेंद्रनाथ महाराज – Wallflux Atom Feed