May 182017
 
काय तुझे ऋण नाथा दयाळा,
जीवन सोहळा चाललासे ।।

अंतरीचा श्वास तव एक नाम,
तूंचि आत्माराम सर्वाठायी ।।

स्वानंद वैभव तव कृपावृष्टी,
भक्तीदंग सृष्टी चित्ती नांदे ।।

हृदय अतरंगी सद्गुरू प्रेमळ,
प्राणची केवळ गुरुराव ।।

स्वरूप अर्पण चरणी आत्मनंदी,
लावी ब्रह्मानंदी स्वर अंती ।।

पराग देशपांडे.

नाथमाऊली नमाे नमं.
 1
।।अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज भगवान श्री नरेंद्रनाथ महाराज की जय।।
 1
नयनी अवघे पंचप्राण माऊली चरणी लीन मन
 1


Source: प पु नरेंद्रनाथ महाराज – Wallflux Atom Feed