May 202017
 
संत, सतपुरुष ,योगी,गुरुपदावर कार्य करणाऱ्या व्यक्ती त्यांचा वेष,परिवेष बघून कधी कधी सामान्य जन त्यांना ,त्यांच्या कार्याच्या प्रखरतेला ओळखू शकत नाही ते त्यांनाही आपल्यासारखेच समजतात परंतु जे लोक अध्यात्म थोडा फार जाणतात,जे सतत उपासनेत राहतात ,जे योगी असतात त्यांना ह्या सत्पुरुषांना ओळखण्यास वेळ लागत नाही ते कुठल्याही वेशांत असले तरी त्यांची पूर्ण ओळख त्यांना होत असते त्याचीच एक प.पु.सद्गुरू नरेंद्रनाथ महाराजांच्या सहवासातील एक अनुभूती कांहि वर्षांपूर्वी प पु काका गोमूख हिमालयात गेले होते. बरोबर बरेच शिष्य होते. काका अगदी सामान्यां सारखे पँट शर्ट मधे होते. आपली उपासना, साधना व आपल्या गुरू कार्यात ते दंग होते. तेथे त्यांना एका नाथपंथीयानी खूप दूरून पाहिले. पहिल्या दृष्टितच त्यांनी प पू काकांना व त्यांच्या सामर्थ्याला ओळखले. त्यांना त्यांच्या समाधिस्थ गुरूंनी आदल्या दिवशीच काकां विषयी संपूर्ण माहिती दिली होती व काकांच्या उपस्थतीत प्रत्यक्ष देव दर्शनाचाआग्रह त्यांना धरण्यास सांगितला होता. अत्यंत साध्या वेषातील काकांना कोणीहि ओळखू शकणार नाहीत अशा सामर्थ्याचा त्या नाथपंथियानी फायदा घेतला व त्यांच्या समाधिस्थ गुरूंच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन काकांच्या कृपेने त्यांना प्रत्यक्ष देवदर्शन झाल.
आज कांहि वर्षांनी काका आपल्या शिष्यांसह हिमालयाकडे जात आहेत. त्यांचा शिष्यां बरोबरचा फोटो पहा.
ह्या सामर्थ्याची ओळख सामान्यांना कशी होणार ?
इतके वर्ष आपण त्यांच्या सान्निध्यात राहून काय साधल असेल ?
धन्य आहेत ते शिष्य जे त्यांच्या सहवासात हिमालयात जात आहेत.


Source: प पु नरेंद्रनाथ महाराज – Wallflux Atom Feed