Jan 072018
 
नवनाथ भक्तिसार पारायण व अतिसौरी महायागाचा अतीशय उत्साहात प्रारंभ संभाजीनगर इथे झालेला आहे.काल कानिफनाथ संस्थानाचे सचिव माननीय श्री.मधुकरराव साळवे गुरुजी यांनी भेट दिली येथील भव्य आयोजनाचे त्यांनी कौतुक केले. प.पु.सद्गुरु नरेंद्रनाथ महाराज यांनी नाथपंथ सर्व पंथाना गुरुस्थानी का आहे याचे विस्तृत आणि रसाळ प्रवचन केले तसेच काल पुणे येथील कीर्तनकार वासुदेवबुवा बुरसे यांनी कीर्तन सेवा दिली.अतिशय सुश्राव्य असे कीर्तन सादर केले.तसेच त्यांनी प .पु.नरेंद्रनाथ महाराज जे कार्य करतात आहे ते नाथ पंथाच्या अखंड गुरुपरंपरेतून चालत आलेले आहे आणि ते सोळावे नाथ या रूपातच कार्य करतात आहे याचा विशेष उल्लेख केला.भाविकांनी या यज्ञाच्या निमित्ताने हवन आणि अन्नदानात सहभागी होऊन या पुण्य पर्वणीच लाभ घ्यावा असे प्रतिपादन बुरसे बुवानी केले.


Source: प पु नरेंद्रनाथ महाराज – Wallflux Atom Feed