नाथशक्तिपीठाधीश प.पू.श्री नरेंद्रनाथ महाराज गोव्याच्या पद्मनाभ संप्रदायाच्या श्री क्षेत्र तपोभूमीचे मठाधीश प.पू. ब्रह्मेशानंद महाराज यांच्या आमंत्रणास मान देउन त्यांच्या मठात गेले असता प.पू. नरेंद्रनाथ महाराजांचे स्वागत व श्रध्दापूजन पद्मनाभ मठाच्या वैदिकांनी मंत्र जागर करुन केले.
प.पू. ब्रह्मेशानंद महाराज ह्यांचे कार्य देश विदेशात पसरले आहे. व नुकतेच ते इंग्लंड येथील परीसंवादात भाग घेउन आले आहेत.
प्रथम प.पू. नरेंद्रनाथ महाराजांनी एक मुखी दत्ताचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी तेथील वेद शास्त्री व त्यांच्या गुरु माता यांना मार्गदर्शन केले. यावेळी दत्त जयंतीचे पर्व प्रारंभ होत असतांना आपण आमचे येथे भगवान श्री दत्तस्वरुप म्हणून आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केले ही आमच्यासाठी महद भाग्याची गोष्ट आहे. अशा शब्दात तपोभूमीच्या गुरुमाता यांनी प.पू. नरेंद्रनाथ महाराजांचा गौरव केला.
यावेळी श्री श्रीकांत शास्त्री यांनी प.पू.श्री नरेंद्रनाथ महाराज यांच्या कार्याची माहिती प.पू. ब्रह्मेशानंद महाराज ह्यांना दीली. त्याप्रसंगी “वेद मंत्रांच्या माध्यमातुन भाग्याचे पुनरुज्जीवन” ह्या नाथ शक्ति पीठा च्या माहीती पुस्तीकेचे अवलोकन करीत असताना देवतांच्या प्रतिमा अग्नी ज्वाळेतुन प्रगट झालेल्या पाहुन ते आपले आश्चर्य लपवु शकले नाहीत व ते उद्गारले “ये कैसे हो सकता है.”
प.पू. ब्रह्मेशानंद महाराज ह्यांनी प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व कार्य उत्कर्षासाठी आशीर्वाद घेतले.
प.पू. ब्रह्मेशानंद महाराजांचे तपोभूमीत या दत्त जयंती सप्ताहात दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. श्री दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना प.पू.नरेंद्रनाथ महाराजांनी करावी अशी आंतरिक इच्छा पू. ब्रह्मेशानंद महाराजांनी व्यक्त केली. परंतु प.पू.नरेंद्रनाथ महाराजांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे तसे शक्य झाले नाही.
चर्चे दरम्यान ब्रह्मेशानंद स्वामी महाराज म्हणाले तपोभूमीत आपल्या आशीर्वादाने व मार्गदर्शनात नाथपंथाच्या प्रसारासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आम्हाला आनंदच वाटेल. ते पुढे म्हणाले की, तपोभूमीच्या गोवा चॅनलवरुन आम्ही पू.नरेंद्रनाथ महाराजांची पंथाचा प्रसार करणारी तसेच आध्यात्मिक उन्नतीला मार्गदर्शक ठरणारी अमृतवाणी प्रक्षेपीत करु. त्यांचे चॅनल गोवा राज्यात लोकप्रिय असून आता युरोपातील सर्व देशांमध्ये तिचे प्रक्षेपण होत असते.
यानिमित्त प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांचे भगवान श्री दत्तात्रेय महात्म्य व सूर्य संक्रमणावरील प्रवचन तपोभूमीच्या गोवा चॅनलच्या प्रक्षेपणासाठी मुद्रीत करण्यात आले.
ब्रह्मेशानंद स्वामी महाराज पुढे म्हणाले की गोवा राज्यात विदेशी संस्कृती आणि भोगवादी संस्कृतीने धुमाकुळ घातला आहे. अशा वेळी मनुष्य सत्शील, धार्मिक, सत्प्रवृत्त झाला पाहिजे ही आजची आवश्यकता आहे. या साठी नाथपंथाच्या कार्यपध्दती नुसार व पू. नरेंद्रनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाने आम्ही संस्कृती व धर्म रक्षणासाठी लवकरच कार्यक्रमाची आखणी करु.