समस्या आणि समाधान

Aug 242015
 
गुरु शिष्य संबंध

*** एका शिष्याने पाठवलेला संदेश व त्या अनुषंगाने सद्गुरुंचे मार्गदर्शन *** साधारणतः जनसमुदायाचे अनुकरण करत चालणारा माणूस, त्या जनसमुदायाच्या पुढे जाऊन स्वतःचे वेगळे विश्व निर्माण करू शकत नाही. असा माणूस तो जनसमुदाय जिथे पोहचेल तीथ पर्यंतच पोहोचु शकतो. मात्र जे लोक जनसमुदायाने घेतलेला मार्ग सोडुन, वेगळा मार्ग अनुसरतात ते अशा ठिकाणी पोहोचु शकतात, जेथे आजपर्यंत […]

Aug 242015
 
अकोल्यातील  सभा दि. 26/08/15

नाथ शक्ति पीठाची साप्ताहिक सभा दिनांक 26/ 08 / 15 ला सायंकाळी ठिक 7 वाजता श्री नरेंद्र चानकर यांच्या घरी आहे. सर्वांनी वेळेत उपस्थित राहुन विचार मंथनात सहभाग  घ्यावा.  नाथ शक्ति पीठाच्या प्रगती  च्या  दृष्टीने आपल्याला कोणाला सोबत आणायचे असेल तर जरूर आणावे. स्थळ:-B/18, कलेक्टर कॉलनी, नविन बस स्टैंडच्या मागे,सपकाळ हॉस्पिटल जवळ. अकोला. फ़ोन:- 9822219542

Aug 202015
 
उपासनेचे महत्त्व

रामदास स्वामी म्हणतात, ” उपासनेचा मोठा आश्रयों; उपासनेवीन निराश्रयो” अर्थात, उपासना केल्याने मनुष्य तरुन जाऊ शकतो, व उपासनेचा अभाव म्हणजेच पशुत्व. कीटक पशु पक्षी यांचे जीवन म्हणजे “भोग” भोगणे. परंतु मनुष्य जन्मात मात्र साधनेतुन भोग कमी करणे व मोक्ष प्राप्ति करणे हे शक्य आहे. सध्याच्या युगात भाक्तिमार्ग हा सहजसाध्य आहे.  जप तप अनुष्ठान ह्या पेक्षा […]

Aug 092015
 
गुरु, अध्यात्म, व मानवीजीवन

“गुरु देह नाही,
गुरु ग्रंथ नाही,
गुरु नाही जादु, चमत्कारं काही,
शिवोहम् शिवोहम् ध्वनि अंन्तरात,
भजावे गुरु व्यंकटेशास नित्य”

Aug 042015
 

आयुष्यात जवळच्या व्यक्तिने केलेला विश्वासघात आणि; योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक, माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात..! वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही…. तो थांबतो, वेळ जाऊ देतो, अन पुन्हा एकदा बाहेर पडतो….. घेऊन, तीच भरारी, तीच दहशत….. अन तोच दरारा!!! जरा विचार करा – – – पराभवाने माणुस संपत […]

Aug 032015
 
गुरुपौर्णिमा २०१५

गुरुपोर्णिमे निमित्त नरेंद्रनाथ महाराजांची पाद्यपूजा करताना शिष्य. सद्गुरु श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या आशीर्वाचनाचा शिष्य मंडळीनी लाभ घेतला. संध्याकाळी काकांचे गुरु व्यंकटनाथ महाराजांचे सांप्रदाईक भजन करताना श्री नरेंद्रनाथ महाराज व शिष्य मंडळी. श्री दत्तराज विद्यासागर, अकोला त्यांचे विचार महाराजांसमोर कथन करताना.

Aug 032015
 

मावळता सूर्य विचार देऊन जातो, उगवता स्फूर्ती देतो. दृष्य अदृष्य स्वरुपात शक्ती सदैव कार्यरत असते. आपण त्याच्या कडे कसे पाहतो तसे आपल्याला भासते. खर ज्ञान व्हायला अंधारातून जावेच लागते.

Jul 312015
 
गुरु पौर्णिमा ऊत्सव २०१५

गुरु पौर्णिमा कार्यक्रमास सकाळी ५ वा. सुरुवात झाली. त्यावेळेस स्वतः नरेंद्रनाथ महाराज त्यांच्या शिश्यां समवेत परम गुरु व्यंकटनाथ महाराजांची काकड आरती करताना वर दीसत आहेत. गुरु पौर्णिमा कार्यक्रमादरम्यान नरेंद्रनाथ महाराज त्यांच्या गुरुंची, व्यंकटनाथांची उपासना, आन्हिक त्यांच्या स्वतःच्या शिश्यां समवेत करताना वर दीसत आहेत.

Jul 312015
 
गुरू विषयी चे संभ्रम

आपल्या सर्वाचाच अनुभव आहे कि, होऊन गेलेल्या थोर व्यक्ती किंवा संतांचे स्मरण झाले की मन कसे भाराहून जाते आपण त्यावेळी असतो तर …..  किंवा  अशा विभूतींची भेट झाली असती तर …. असे  अनेक विचार तरंग मनात येऊन जातात. हे विषेश की अशावेळेस आपण आजचे सत्पुरुष जे उद्याच्या पिढीचे आदर्श असतात ह्याच्या कडे  मात्र आपण सहजतेने […]

Jul 292015
 
नाथशक्तिपिठातील गुरूपौर्णिमा

नाथ शक्ति पीठात आपले स्वागत आहे. नाथ शक्ति पीठ, अकोला हे नव नाथ पंथ मालिकेतील महत्वाचे स्थान असुन येथे नाथ पंथाच्या अखंड गुरु परंपरेची व अखंड उपासनेची शक्ति एकवटली आहे. ह्या नाथ पंथाची उत्पत्ती प्रत्यक्ष श्री भगवन शंकर ह्यांच्या पासून श्री दत्तात्रयां मार्फत झालेली आहे. हा पंथ कलीयुगाच्या प्रारंभा पासून अवीरतपणे, अखंडणे, समाजोथानाचे, ज्ञानदानाचे, अध्यात्मीक […]