अनुक्रमणिका

हिमालयातील साधना तथा गोमुख येथील विलक्षण अनुभव

नाथपंथाचे कार्य आमच्या आशीर्वादाने होईल असा सद्गुरु व्यंकटनाथ महाराज यांनी आशीर्वाद देऊन पुढील गुरु कार्य करण्याची आज्ञा नरेंद्रला केली होती नाथ पंथाच्या इतिहास पाहिला तर सर्व नाथांनी कार्याला लागल्यावर तपश्चर्या केली आहे, तीर्थाटन केले आहे, अन्नदान केलं आहे. नरेंद्रला सद्गुरुंनी कार्याची आज्ञा केल्यानंतर तपश्चर्येला जाण्याचा योगच नव्हता. सर्व नाथांनी तपस्या लहान वयातच केली होती. नरेंद्रच्या वयाच्या 56 व्या वर्षी गुरूंनी गुरुकार्याची आज्ञा केली होती. 1955 ते 1993 ही 28 वर्षे सद्गुरूंनी त्यांना हवे तसे कर्म व कार्यनरेंद्रकडून करून घेतले.

तपश्चर्या, साधना आणि गुरूंचा आशय

तत्त्वतःतप: श्चर्येचा भाग, साधनेचा भाग, ज्ञानार्जन हे सर्व स्वतः सद्गुरूंनी करवून घेतले होते. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हा भाग पूर्वीच होऊन गेला होता. एकदा बोलताना ते नरेंद्रला म्हणाले चाळीस वर्षे आम्ही तुझी परीक्षाच घेतली तुला निरनिराळ्या पद्धतीने तपासून पाहिले. अनेक संकटे तुझ्यावर आलीत, परंतु तू डगमगला नाही व अम्हाला सोडून गेला नाही. आता तू कशाचीच काळजी करू नको. तुला जे हवं ते सर्व तुझ्या जवळच तुला मिळेल कुठेही जायची गरज पडणार नाही.

गिरीच्या बालाजी प्रसंग

एकदा माझी पत्नी कुंदा मला आग्रहाने म्हणाली, आपण सर्वजण गिरीच्या बालाजीला दर्शनासाठी जाऊन येऊ. तिला म्हटले आपण अवश्य जाऊ परंतु जाण्यापूर्वी सद्गुरूंचे दर्शन घेऊन त्यांची अनुमती घेऊन आपण बालाजीच्या दर्शन साठी जाऊ. सद्गुरु कडे गेल्यावर त्यांना विनंती केली की महाराज आम्हा उभयतांची गिरीच्या बालाजीच्या दर्शनासाठी जाण्याची इच्छा आहे. गिरीच्या बालाजी ने आपली स्वतःची प्रतिमा म्हणून स्वतःची धातूची मूर्ती माधवनाथ यांना देऊन “दत्त क्या और बालाजी क्या दोनों एक ही है” असे सांगून बालाजीच्या मूर्तीची स्थापना देवगावला महाराजांच्या घरच्या मंदिरात करायला सांगितले होते.

महाराज नरेंद्रला म्हणाले तू बालाजी कडे कशाला जातोस? बालाजीच तुझ्याकडे येईल. नरेंद्र म्हणाला महाराज मी तुमचे दर्शन घेतो आणि हेच बालाजीचे दर्शन झाले म्हणून शांत राहतो. ते म्हणाले तू कुठे जाण्याची आवश्यकता उरली नाही. तुला जे हवे ते तू जिथे असशील तिथे येईल.

नर्मदा परिक्रमा प्रसंग

एकदा नर्मदा परिक्रमा करायची इच्छा झाली. महाराज म्हणाले तू काहीही करायची गरज राहिली नाही, तुला जे हव असेल ते तू सांग ते तू जिथे असेल तिथे येईल. इतर कुठेही जाण्याची गरज उरली नाही.

हिमालय साधनेसाठी प्रवास

1993 नंतर 2002 साली नरेंद्रने हिमालयात दोन महिने साधना करण्याचे ठरवले. बरेच शिष्य घेऊन हिमालयात गेलो. मनात अपेक्षा होती साधू भेटतील. परंतु उलट साधूच म्हणू लागले—“आम्ही आपली वाट पाहत होतो.” व्यंकटनाथ महाराज यांनी नरेंद्रला जे घडवले त्याचा प्रत्यय सतत येत होता.

गंगोत्री आणि गोमुख यात्रा

आम्ही गंगोत्रीला गेलो. गोमुखला निघालो. संध्याकाळी पोहोचलो. थंडी वाढली होती. आम्ही चार जण नदीकाठी वेगवेगळ्या ठिकाणी बसून उपासना करायचे ठरवले. गंगेचे पाणी वितळलेल्या बर्फाचे—अत्यंत थंड. आंघोळ अशक्य, म्हणून प्रार्थना केली की “हे गंगे, तुझी कृपा असेल तर जलप्रोक्षण होईल अशा पद्धतीने आमची आंघोळ घडव.”

विलक्षण अनुभव : गोमुखातील जलप्रोक्षण

उपासना सुरू झाल्यावर असे जाणवू लागले की वाहत्या पाण्याचे अगदी सूक्ष्म, सौम्य थेंब पायावर, हातावर, मस्तकावर उडत होते. गार पण सुसह्य. जणू अभिषेक. हा अनुभव सर्व चौघांनी घेतला.

रामबाबांची ओळख आणि गुरुंच्या आगमनाची पूर्वसूचना

दूरून पांढरी कफनी घातलेला रामबाबा हे सर्व पाहत होते. त्यांनी सांगितले की त्यांचे गुरु नाथपंथी होते, चाळीस वर्षांपूर्वी समाधी घेतली होती आणि त्यांनी नरेंद्र येणार असल्याचे पूर्वसूचित केले होते. रामबाबा आमची वाट पाहत होते.

गोमुखातून उतरतानाची घटना — सावलीची किमया

गंगेच्या काठी उपासनेनंतर आम्ही उभे राहणार इतक्यात नारायण म्हणाला “काका, मला चालताच येत नाही.” घोडे दूर. साधन नाही. काहीच उपाय नव्हता.

तेव्हा काका म्हणाले “दोन मिनिट माझ्या सावलीत उभा राहा आणि सावलीतच पावले टाकू लाग.” आणि विलक्षण घडले — नारायण सहज चालू लागला. नंतर ३० किमी गंगोत्रीपर्यंत पूर्ण चालतही गेला.