अनुक्रमणिका

नवनाथांच्या कार्यकाळाचा सारांश

श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या अमृतवाणीतून प्रकट झालेल्या *नवनाथ बोधामृत* ह्या ग्रंथातील नाथपंथाविषयी दिलेली माहिती खालील उताऱ्यात दिली आहे. नवनाथ भक्तिसार हा अतीश्रेष्ठ, अद्भुत, परमपावन, मन गुंग करून ठेवणारा एक प्रासादिक ग्रंथ आहे.

हा रम्य ग्रंथ, भगवान चैतन्य मच्छिंद्रनाथांपासून सुरू झालेल्या नवनाथांच्या अद्भुत कार्याचे वर्णन करतो. या ग्रंथात वर्णन केलेल्या घटना २२३ वर्षांपूर्वीच्या आहेत.

समाजामध्ये नाथपंथाविषयी अनेक मत–मतांतरे व एक प्रकारची भीती देखील आहे. ही भीती अनाठायी कशी आहे व जीवनामध्ये नाथपंथाच्या तत्त्वप्रणालीचा लाभ कसा घेता येईल हे या पुस्तकात सांगितले आहे.

नाथपंथाची उत्पत्ती व योजनात्मकता

स्वतः ब्रह्मा, विष्णू व महेश यांनीच या पंथाची योजना केली आहे. म्हणजे विधात्यानेच हा पंथ निर्माण केला आहे. सध्याच्या कलियुगांत हा पंथ आपल्याला भक्तीमार्गाकडे नेऊन आपली उन्नती कशी करू शकतो हे येथे सांगितले आहे.

नाथपंथात आज सुरू असलेल्या घटनांचा उल्लेख ओघाने केला आहे. अखंडपणे, अव्याहतपणे आजही हा पंथ कार्यरत आहे.

नवनाथ भक्तिसारातील बोध

*नवनाथ भक्तिसार* या मालूकवी–रचित पोथीत वर्णन केलेल्या घटनांचा उल्लेख, त्यातून कोणता बोध घ्यावा — हे येथे सांगितले आहे.

आजच्या कलियुगांत कार्यरत कसे राहावे, कलीयुगाचा दैनंदिन जीवनावर होणारा विपरीत परिणाम कसा टाळता येईल, हे या ग्रंथावरून कळू शकते.

पंथाला सहाय्यभूत होणाऱ्या शक्ती

ब्रह्मा, विष्णू, महेश, भगवान दत्तात्रेय, जगन्माता देवी, तसेच भूत–प्रेत, पिशाच, यक्ष, गंधर्व, डाकीणी, शांखिनी, यक्षिणी, वेताळ, नागदेवता इत्यादी सर्वच शक्ती या पंथाला सहाय्यभूत कशा होतात हे येथे वर्णन केले आहे.

दत्तसंप्रदाय किंवा दत्तपंथ हा वेगळा असून नाथपंथ म्हणजे दत्तसंप्रदाय नव्हे. स्वतः भगवान दत्तात्रेय हे या पंथाचे आराध्य दैवत आहेत — ही त्यांचीच योजना आहे.

ज्यांना पंथाचा उपदेश प्राप्त झाला आहे, त्यांना सर्व देव–देवता आणि सर्व प्रकारच्या चांगल्या–दुष्ट शक्ती त्यांच्या कर्मानुसार सहाय्यभूत होतात व त्यांचे जीवन सुखी करण्यासाठी कार्य करतात.

नाथपंथातील मूलभूत तत्त्वे

नाथपंथाचे उद्देश काय? नाथपंथाची योजना का? नाथपंथ स्थापनेसाठी नवनारायणांना द्वारकेत का बोलाविले? नाथपंथ व इतर पंथातील फरक? नाथपंथ कोणी व कसा निर्माण केला? नाथपंथाचे महत्त्व व वैशिष्ट्य काय?

नवनारायण कोण होते, त्यांचा परिचय, नाथ महाराजांचे दैनंदिन जीवन, पूजा व उपासना पद्धती, साधकाने पूजा कशी करावी, विश्व हे हिंदुतत्त्वावर कसे चालते, नवनाथांचे ब्रह्मांडावर प्रभुत्व, त्यांची अनुग्रह–पद्धती, महात्म्य व परिणाम, धर्मबीज कसे साजरे करावे — याची माहिती येथे दिली आहे.

पंथाची वाटचाल व सामाजिक कार्य

नवनाथांच्या कार्यकाळाचा सारांश, पंथाने समाजाला दिलेले मार्गदर्शन, नवनारायणांच्या नंतर पंथाची वाटचाल, विकास व कार्यपद्धती, पंथाचे आजचे गुरूकार्य, सामर्थ्य प्रदान करण्याची सहजता, पंथाने केलेले समाजकार्य, *नवनाथ भक्तिसार* पोथी–पारायण व फलश्रुती, सामान्यपणे करावयाची उपासना — या सर्वांचा उहापोह येथे केला आहे.