हा खेळ प्राक्तनाचा की पूर्वजन्मकृतीचा | मज ना कळे कशाचा, कुंठीत बुद्धि वाचा ॥
लिहिले न भाळी त्याने वात्सल्य प्रेम विधीने | पण दोष ना कुणाचा, हा भोग संचिताचा ॥
योगी म्हणोनी म्हणती कुणी कीर्तिगान गाती | मज लोभ ना कशाचा, हा मार्ग कर्मसाधनेचा ॥
आज जीवनात असा टप्पा अनेकांना येतो की स्वतःलाच प्रश्न पडतो—हे माझे पूर्वसंचित का? प्रारब्ध का? भाग्य असे का? अत्यंत प्रामाणिकपणे, नियमाने, कष्टपूर्वक जीवन जगूनही प्रसंगी प्रयत्नांना यश येत नाही. प्रामाणिकपणा टिकत नाही, पैसा धरून राहत नाही; अप्रामाणिकपणा मनाला टोचतो. जीवन कधी कधी दिशाहीन वाटते. ह्या सर्व प्रश्नांची उकल कर्मसाधना करते.
कर्मसाधना केल्याने मन शांत होते, प्रसन्नता वाढते आणि परिस्थितीला समर्थपणे सामोरे जाण्याचे साहस प्राप्त होते. सृष्टीची निर्मिती वेदांपासून झालेली असल्याने संपूर्ण जीवसृष्टीवर वेदमंत्रांचे नियंत्रण आहे. हाच वेदांचा आधार लक्षात घेत नाथशक्तिपीठातून वेदांची महती, त्यांची प्रत्यक्ष उपयुक्तता, नाथपंथ तत्त्वांचा उपयोग आणि कर्मसाधनेद्वारे स्थित्यंतर घडविण्याचे कार्य सुरू झाले.
वेदांची स्तुती अनेकांनी केली, परंतु जीवन बदलण्यासाठी वेदांचा प्रत्यक्ष उपयोग (Applied Vedas) कसा करायचा याचा प्रयोग प्रथमच नरेन्द्रनाथ महाराजांनी सादर केला. भाग्य बदलण्यासाठी, कुयोग दूर करण्यासाठी, योग सुधारण्यासाठी वेदमंत्रांचा जीवनाभिमुख वापर हा नाथपंथातील अभुतपूर्व प्रयत्न मानला जातो.
दर तीन वर्षांनी १०–१५ दिवस चालणारा व्यापक आध्यात्मिक कार्यक्रम —
या महायज्ञात एक लाखांहून अधिक लोकांना अन्नदान होते. नऊ हवनकुंडांवर साधकांच्या सततच्या आहुतींमध्ये अनेकदा देवतांचे प्रकाशरूप फोटोमध्ये प्रकट झाल्याचे अनुभव आले. आजवर पाच अतिसौरी महायज्ञ यशस्वी झाले आहेत.
नाथपंथामध्ये जात–पात, भेदभाव, विभागणी नाही. सर्व समाजासाठी उघडी दारे, सुलभ आध्यात्म, व्यक्तिमत्व विकास, संस्कार आणि कर्मप्रधान जीवनपद्धती हा पंथाचा आधार आहे. नाथशक्तिपीठातून हजारो जणांनी वेदप्रशिक्षण, हवन–यज्ञ संचालन, आध्यात्मिक शिस्त आत्मसात केली असून देशभर यज्ञकार्य करत आहेत.
प्रयत्नांना यश येत नाही, पैसा टिकत नाही, गैरसमज वाढतात, कामे बिघडतात, कुयोग आणि ग्रहबाधा त्रास देतात—या सर्वांसाठी नाथशक्तिपीठात संकल्पित हवन केले जाते. हवनादरम्यान देवतांचे प्रकाशरूप फोटोमध्ये दिसणे, अडथळे दूर होणे, आत्मविश्वास वाढणे, जीवनयोग सुधारणे याचे अनुभव अनेकांना आले आहेत.
गेल्या २६ वर्षांत नाथशक्तिपीठाने कधीही देणगी मागितली नाही, कोणतेही सरकारी अनुदान घेतले नाही. सर्व कार्य गुरुपरंपरेच्या कृपेने सहज पार पडत आहे. अडचणी आल्या की मार्ग निघतो—हेच नाथपंथाचे सामर्थ्य.
तपश्चर्येचे तत्त्व म्हणजे शरीरशुद्धी, मनःशुद्धी, अंतःकरणशुद्धी, इंद्रियनिग्रह, एकांत आणि भावनांवर संयम. पूर्वी अरण्यात तप सहज होते; आज परिस्थिती बदलल्याने तपश्चर्या आता वेगळ्या प्रकारे केली जाते.
आजची तपश्चर्या म्हणजे—
नरेन्द्रनाथ महाराजांनी शरीरशुद्धी, अंतःकरणशुद्धी आणि इंद्रियशुद्धी व्यंकटनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाखाली साधली.
परंपरागत गुरु आणि स्वयं भगवान दत्तात्रेय नाथपंथाच्या कार्यावर आजही कृपाछाया ठेवून आहेत. कलियुग असेपर्यंत हे कार्य अविरतपणे चालू राहील.