अनुक्रमणिका

जीवनातील नैराश्य कारण व उपाय

जन्मो-जन्मांची कहाणी आणि जीवाचा प्रवास

आपण पाहिले की ज्ञानेश्वरांनी सात रेषा काढल्या आणि रेड्याने प्रत्येक रेषा ओलांडताना त्या त्या जन्मात काय झाले हे सांगितले. त्याचप्रमाणे 36 व्या लेखामध्ये स्वतः भगवान दत्तात्रेयांनीही सात रेषा काढून त्या शूद्र माणसाने प्रत्येक रेषा ओलांडल्यानंतर त्याच्या मागील जन्मांची कथा सांगितली. यावरून प्रत्येक जीवाची जन्मो-जन्मांत चालणारी कहाणी असते हे स्पष्ट होते.

जोपर्यंत जीव काम, क्रोध, मद, मोह, मत्सर यांच्यापासून पूर्णपणे मुक्त होत नाही, तोपर्यंत हा जीवनप्रवास चालूच राहतो. नारळ हलवल्यावर खोबऱ्याचा डौल आणि नारवंटी वेगळा आवाज देतात तसेच — जेव्हा शरीर आणि प्राण एकत्र मिसळलेले असतात, तेव्हा त्यांना वेगळे करता येत नाही. शरीर–प्राण विभक्त होणे म्हणजेच आत्ममुक्ती, आणि तोपर्यंत पिंडाचे भोग सुरूच राहतात.

व्यंकटनाथ महाराजांचा अलौकिक अनुभव — देहभोग आणि आत्मभोग वेगळे असणे

व्यंकटनाथ महाराजांना एकदा अत्यंत उच्च ताप (१०५°F) आला होता. डॉक्टरांनी स्नानास सक्त मनाई केली होती, परंतु त्यांनी नित्यनैमित्तिक करण्याचा संकल्प केला. पाणी आणले गेले, त्यांनी टॉवेल मागितला, टॉवेल गुंडाळून धोतर एका कोपऱ्यात ठेवले आणि म्हणाले, “आमचा ताप पहा.” ताप ९७°F भरला.

नंतर म्हणाले, “धोतराला थर्मामीटर लावा.” धोतराचा ताप १०५°F भरला!

त्यांचे सर्व नित्यकर्म होत असताना शरीराचा ताप ९७°F होता आणि धोतराचाच ताप १०५°F होता. दोन तासांनी त्यांनी तोच तापाचा धोतर नेसला आणि ताप पुन्हा १०५°F झाला.

हे केवळ योगीद्वारेच शक्य आहे. निर्जीव वस्तूस ताप देणे आणि स्वतः त्यापासून मुक्त होणे — हा अनुभव तेव्हाच घडतो, जेव्हा शरीर–आत्मा संबंध तात्पुरता सुटतो. सामान्य जीवांना हे शक्य होत नाही.

नैराश्य — जीवनातील मोठा शत्रू

सामान्य जीवांच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे नैराश्याचा अनुभव. जीवनात घडणाऱ्या घटना या अनेकदा पूर्वजन्मातील कृत्यांची सूचक असतात. आपण योग्य पद्धतीने, विवेकबुद्धीने प्रयत्न करीत असतो; तरीही काहीतरी अदृश्य अडथळे वारंवार येतात.

उद्दिष्ट साधणे कठीण होते, मनाची शक्ती कुंठित होते, “आपले हेच योग, हेच भोग” अशी समजूत होते. समोरच्या लोकांचा विनाकारण गैरसमज होऊ लागतो. नकारात्मक विचारांची साखळी तयार होते.

त्याच परिस्थितीत इतर लोक सहज पुढे जाताना दिसतात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो; तर नकारात्मक विचार असलेल्या माणसाचा आत्मविश्वास सतत ओसरत जातो.

आत्मविश्वास का कमी होतो? पूर्वसंचिताचा प्रभाव

हा आत्मविश्वास औषधे, समुपदेशनाने निर्माण किंवा टिकवून ठेवता येत नाही. कारण:

यांमुळे निर्माण झालेली असते.

गर्भावस्थेत पिंड स्थापन होताना ज्या बीजासोबत पूर्वसुकृत–पूर्वदोष येतात, तेच पुढील आयुष्यात वाढत राहतात. त्यामुळे प्रयत्न योग्य असूनही यश मिळत नाही.

अनाकलनीय गैरसमज — मन:स्थितीवर होणारा प्रभाव

आपण प्रामाणिकपणे वागलो तरीही काही व्यक्तींना विनाकारण गैरसमज होतो. यामागे तर्क नसतो; ही पूर्वसंचितातील अडचण असते. पूर्वसंचितातील दोष क्षीण झाल्यावरच हे गैरसमज नाहीसे होतात. कसे, का, केव्हा बदल झाला हेही कळत नाही, परंतु बदल कायमचा होतो.

जीवनातील नैराश्य दूर करण्याचा मार्ग — योग्य कर्म आणि साधना

योग्य कर्म, साधना, उपासना केल्याने:

नाथशक्तिपीठात हा अनुभव तीस वर्षांपासून साधकांना प्रत्यक्ष मिळत आहे.