अनुक्रमणिका

माणसाचे योग व भोग

पंचमहाभूतांवर आधारित राशी-विभाजन

ब्रह्मांडातील सातवा घटक म्हणजे जगातील सर्व माणसे व त्यांचे योग, भोग हे फक्त बारा प्रकारातच म्हणजे राशींमध्ये विभागले गेले आहेत. आता या १२ राशींचे विभाजन हे चार महातत्त्वांमध्ये केले आहे.

चार महातत्त्वे व त्यांच्या राशी

पंचमहाभूतांचे भूगोलाशी संबंध

भौगोलिक दृष्टीने विचार केला तर असे लक्षात येते की भारतामध्ये ह्या पाच तत्त्वांची शिवलिंगे निरनिराळ्या ठिकाणी आहेत. कांचीपूरमचे लिंग हे पृथ्वीतत्त्वाचे आहे, तर आपतत्त्वाचे शिवलिंग तिरुवाणैकावल (त्रिचनापल्ली) येथे आहे. तिरुअण्णामलाई येथील लिंग हे तेजतत्त्वाचे असून आंध्रमधील कालाहस्ती (तिरुपतीजवळ) येथे वायुतत्त्वाचे शिवलिंग आहे. तामिळनाडूतील चिदंबरम येथे आकाशतत्त्वाचे लिंग आहे.

अशाप्रमाणे भूतलावरच्या सर्व व्यक्तींवर पंचमहाभूतांचा खोलवर परिणाम झाला असून सर्व लोकांचे वर्गीकरण हे पंचमहाभूतांच्या तत्त्वांनुसार १२ राशींत केले आहे. राशी म्हणजे त्या त्या महातत्त्वाचे जे निजतत्त्व, जे निजगुण तेच त्या त्या राशींच्या लोकांमध्ये राहतील. म्हणजे प्रामुख्याने तेच स्वभाव त्या त्या लोकांचे राहतील. वासनादेखील राशीप्रमाणेच राहणार.

मेष (अग्नितत्त्व)

अश्विनी, भरणी, कृत्तीका नक्षत्रे मिळून ही रास होते. कार्तिक महिना, १, ६, ११ या तिथी व रविवार हे घातक असतात. वद्यपक्ष चांगले फळ देतो. दक्षिण दिशा उत्कर्षाशाची असते. सूर्य नाडीवर महत्त्वाची कामे करावीत. भगवान दत्तात्रेय व प्रभू रामचंद्रांची उपासना करावी.

वृषभ (भूमितत्त्व)

कृत्तिका, रोहिणी व मृग नक्षत्रे मिळून ही रास होते. मार्गशिर्ष महिना, ५, १०, १५ या तिथी व शनिवार घातक असतात. शुद्धपक्ष चांगले फळ देतो. पूर्व दिशा उत्कर्षाशाची. चंद्र नाडीवर महत्वाची कामे करावीत. देवीची उपासना करावी.

मिथुन (वायुतत्त्व)

मृग, आर्द्रा, पुनर्वसू नक्षत्रे मिळून रास होते. आषाढ महिना, २, ७, १२ तिथी व सोमवार घातक. वद्यपक्ष शुभ. उत्तर दिशा उत्कर्षाशाची. सूर्य नाडीवर महत्त्वाची कामे. शंकर व वीर हनुमानाची उपासना.

कर्क (जलतत्त्व)

पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा नक्षत्रे. पौष महिना, २, ७, १२ तिथी व बुधवार घातक. शुद्धपक्ष शुभ. पश्चिम दिशा उत्कर्षाची. चंद्र नाडीवर कामे करावीत. विष्णू व गणपतीची उपासना.

सिंह (अग्नितत्त्व)

मघा, पूर्वाङ्गाल्गुनी, उत्तराङ्गाल्गुनी नक्षत्रे. ज्येष्ठ महिना, ३, ८, १३ तिथी व शनिवार घातक. वद्यपक्ष शुभ. दक्षिण दिशा उत्कर्षाची. सूर्य नाडीवर महत्त्वाची कामे. भगवान दत्तात्रेय व प्रभू रामचंद्रांची उपासना.

कन्या (भूमितत्त्व)

उत्तराङ्गाल्गुनी, हस्त, चित्रा नक्षत्रे. भाद्रपद महिना, ५, १०, १५ तिथी व शनिवार घातक. शुद्धपक्ष शुभ. पूर्व दिशा उत्कर्षाची. चंद्र नाडीवर कामे. देवीची उपासना.

तूळ (वायुतत्त्व)

चित्रा, स्वाती, विशाखा नक्षत्रे. माघ महिना, ४, ९, १४ तिथी व गुरुवार घातक. वद्यपक्ष शुभ. उत्तर दिशा उत्कर्षाची. सूर्य नाडीवर कामे. शंकर व वीर हनुमानाची उपासना.

वृश्चिक (जलतत्त्व)

विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा नक्षत्रे. अश्विन महिना, १, ६, ११ तिथी व शुक्रवार घातक. शुद्धपक्ष शुभ. पश्चिम दिशा उत्कर्षाची. चंद्र नाडीवर कामे. विष्णू व गणपतीची उपासना.

धनू (अग्नितत्त्व)

मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा नक्षत्रे. श्रावण महिना, ३, ८, १३ तिथी व शुक्रवार घातक. वद्यपक्ष शुभ. दक्षिण दिशा उत्कर्षाची. सूर्य नाडीवर कामे. भगवान दत्तात्रेय व प्रभू रामचंद्रांची उपासना.

मकर (भूमितत्त्व)

उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा नक्षत्रे. वैशाख महिना, ४, ९, १४ तिथी व मंगळवार घातक. शुद्धपक्ष शुभ. पूर्व दिशा उत्कर्षाची. चंद्र नाडीवर कामे. देवीची उपासना.

कुंभ (वायुतत्त्व)

धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा नक्षत्रे. चैत्र महिना, ३, ८, १३ तिथी व गुरुवार घातक. वद्यपक्ष शुभ. उत्तर दिशा उत्कर्षाची. सूर्य नाडीवर कामे. शंकर व वीर हनुमानाची उपासना.

मीन (जलतत्त्व)

पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा, रेवती नक्षत्रे. फाल्गुन महिना, ५, १०, १५ तिथी व शुक्रवार घातक. शुद्धपक्ष शुभ. पश्चिम दिशा उत्कर्षाची. चंद्र नाडीवर कामे. विष्णू व गणपतीची उपासना.

राशीनुसार ठोकळमानाने स्वभाववैशिष्ट्ये

टीप

स्वभाव ठोकळमानाने दिले आहेत. इतर ग्रह, त्यांची युती व पत्रिकेतील घरे यांनुसार स्वभावात बदल होऊ शकतो.