नाथ शक्ति पीठात आपले स्वागत आहे. नाथ शक्ति पीठ, अकोला हे नवनाथ पंथ मालिकेतील अत्यंत महत्त्वाचे स्थान असून येथे नाथपंथाच्या अखंड गुरुपरंपरेची व अखंड उपासनेची शक्ति एकवटली आहे.
ह्या नाथ पंथाची उत्पत्ती प्रत्यक्ष भगवान शंकरांपासून, श्री दत्तात्रेयांच्या माध्यमातून झालेली आहे. हा पंथ कलीयुगाच्या प्रारंभापासून अखंडपणे *समाजोन्नती*, *ज्ञानदान*, *अध्यात्मिक मार्गदर्शन* आणि *धार्मिक कार्य* करीत आहे.
नाथ शक्ति पीठाची स्थापना ११ वर्षांपूर्वी करण्यात आली. येथे नवग्रह, श्री दत्तात्रेय, भगवान शंकर, शाबरी देवी, श्री पंचमुखी वीर हनुमान, श्री गणेश आणि श्री व्यंकटनाथ महाराज यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
येथे सतत वेदोक्त मंत्र, नाथपंथी मंत्र, तसेच अखंड जप—उपासना चालू असते.
भारतीय परंपरा, संस्कृती आणि धर्मशास्त्र यांचे शास्त्रोक्त शिक्षण देण्यासाठी येथे वेदशाळेची स्थापना १९९६ मध्ये करण्यात आली. ही वेदशाळा गुरुकुल पद्धतीने कार्यरत असून विद्यार्थ्यांना निःशुल्क शिक्षण दिले जाते.
नाथ शक्ति पीठ ही सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि अध्यात्मिक कार्य करणारी अद्वितीय संस्था असून ॐ एज्युकेशन सोसायटी नावाने *Public Charitable Trust* म्हणून नोंदणीकृत आहे.
याच ठिकाणाहून श्री व्यंकटनाथ महाराज, देवगाव–रंगारी यांचे उत्तराधिकारी श्री नरेंद्रनाथ महाराज नाथपंथाचे गुरूकर्म अखंडपणे चालवत आहेत.
दिनांक ३१/७/१५ रोजी गुरूपौर्णिमा आहे. या प्रसंगी नाथ शक्ति पीठात गुरूपूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम पुढीलप्रमाणे:
वेळापत्रक :
आपण सर्वांनी या मंगल प्रसंगाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.