अनुक्रमणिका

वैश्विक परिषदेचे आयोजक

नवनाथ परंपरा व श्रीनाथशक्तिपीठाची स्थापना

चैतन्य श्री मच्छिंद्रनाथ हे नवनाथ परंपरेतील पहिले गुरु आहेत, तर योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराज हे या अखंड गुरु परंपरेतील १५ वे नाथ आहेत. त्यांच्या आज्ञेनुसार त्यांचे उत्तराधिकारी प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराज यांनी अकोला येथे ओम एज्युकेशन सोसायटी अंतर्गत श्रीनाथशक्तिपीठाची स्थापना केली.

ओम एज्युकेशन सोसायटी ही बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अ‍ॅक्ट १९५० अंतर्गत ८ डिसेंबर १९८८ रोजी पंजीकृत झाली. संस्थेचा पंजीयन क्रमांक — F/१९९१. संस्थेतील आर्थिक व्यवहारास कलम ८०-जी लागू आहे.

नाथशक्तीपीठाचे कार्य व याग परंपरा

नाथशक्तिपीठाधीश प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या कृपा–मार्गदर्शनात श्रीनाथशक्तिपीठाने आजवर अनेक सूर्यपंचायतन याग संपन्न केले आहेत. वैदिक व नाथपंथीय ज्ञानाच्या प्रसारासाठी अखिल भारतवर्षात व्यापक भ्रमण केले.

मानवजातीच्या आत्मविश्वासात वाढ, कार्यक्षमतेचा विकास, मानसिक शांती, तसेच वैयक्तिक व कौटुंबिक स्तरावरील संपन्नता— हा या कार्यामागील मूलभूत उद्देश आहे.

कर्मसिद्धांतावर आधारित मार्गदर्शन

श्रीनाथशक्तिपीठाने योगेश्वर श्रीकृष्णाच्या श्रीमद्भगवद्गीतेतील कर्म सिद्धांताच्या आधारे आजवर हजारोंना मार्गदर्शन केले आहे.

शंकराचार्यांची प्रशंसा

नाथशक्तिपीठाच्या कार्याची प्रशंसा पुढील परात्पर गुरूंनी केली आहे—