अनुक्रमणिका

जलतत्त्वाच्या राशींबद्दल विचार

११२ लेखांमध्ये मी आपल्याला माहिती दिली होती की भूमी, आप, तेज आणि वायू या चार महातत्वामध्ये बारा राशी विभागल्या गेल्या आहेत. त्या अशा राशींप्रमाणे उपासना व उपाययोजना - 2.

सृष्टीवरील सर्व मानवजात ही बारा राशींत विभागली आहे. ह्या बारा राशी चार तत्त्वांमध्ये कशा विभाजल्या आहेत, हे आपण पाहिले आहे.

आज आपण जलतत्त्वाच्या राशींबद्दल विचार करू. द्वापारयुगामध्ये प्रभावी असलेल्या जलतत्त्वाचे निजगुण विवेक असलेल्या मीन, वृश्चिक व कर्क राशी.

मीन, वृश्चिक व कर्क ह्या तीनही राशीच्या लोकांनी आपली उपासना ही पश्चिम दिशेकडे तोंड करून करावी. जीवनातील सर्वच महत्त्वाचे काम हे पश्चिम दिशेपासूनच सुरू करावे. ह्या लोकांच्या जीवनातील भरभराटीची दिशा म्हणजे पश्चिम.

सर्व प्रकारचा अभ्यास, ज्ञानसाधना ही पश्चिमेकडूनच सुरू करावी. सर्व प्रकारच्या फायद्याचा प्रयत्न हा पश्चिम दिशेकडूनच करावा. आपतत्त्वाची सिद्धता प्राप्त करणे हे पश्चिम दिशेकडूनच सुलभ आहे.

ब्रह्मांडाशी जलतत्त्वाचा जो काही संबंध आहे त्याप्रमाणे मीन, वृश्चिक, कर्क राशीच्या लोकांचा ब्रह्मांडाशी जो संबंध आहे त्या तत्त्वानुसार उपासनेला पश्चिम दिशेकडून मिळणारी ऊर्जा ही जास्त प्रभावी व फलदायी आहे.

ह्या राशींच्या लोकांना महिन्याचे पहिले पंधरा दिवस, म्हणजे पंचांगातील शुद्ध पक्ष, हा उत्तम फल देणारा आहे. प्रत्येक महिन्याचा शुद्ध पंधरवडा हा या लोकांच्या उपासनेला चांगला असतो. वद्य पंधरवडा हा कमी फलदायी असतो.

शुद्ध पंधरवड्यात सर्व प्रकारची फलदायी, तसेच महत्त्वाची कामे करून घेणे योग्य राहील. उपासना ही नित्यनियमाने बाराही महिने अखंड चालू राहिली पाहिजे.

दिवसाचे चार प्रहर असतात:

ब्रह्मांडातील पंचतत्त्वांचा, सूर्यमंडळाच्या भ्रमणाचा, नक्षत्र-तारांगणाच्या भ्रमणाचा सर्वांवरच सतत परिणाम होत असतो.

ह्या भ्रमणाचा विचार केला तर असे लक्षात येते की, मीन, वृश्चिक, कर्क राशींच्या लोकांसाठी दुसरा व तिसरा प्रहर — संध्याकाळी ५.३० ते रात्री १०.३० या वेळेत केलेली उपासना फलदायी राहते.

ह्याच कालावधीत केलेल्या विविध योजना चांगल्या प्रकारे पूर्ण होतात. शक्य झाल्यास कामाची नवीन सुरुवात ह्या वेळेत करावी. ती लाभदायी ठरेल.

आपल्या जन्मनक्षत्र मंत्राचा जप रोज ह्या वेळेत करावा.

माणसाला दोन नाकपुड्या असतात.

नाडी आपोआप बदलत असते. श्वसनाचा आणि शरीरातील ग्रहांचा, तसेच संपूर्ण ब्रह्मांडाचा संबंध सदैव असतो.

जलतत्त्वाच्या लोकांसाठी — मीन, वृश्चिक, कर्क — चंद्रनाडी सुरू असेल तेव्हा केलेले व्यवहार, साधना, अभ्यास, नियोजन हितकारक ठरते.

जर चंद्रनाडी सुरू नसेल तर उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी सुरू करण्याचा प्रयत्न करावा.

या तिन्ही राशींच्या लोकांची वासना मोह व चांगले खाणे ह्यात असते. जन्ममरणाच्या भोगांची तीव्रता कमी करण्यासाठी ही वासना नियंत्रित करणे जरूरी आहे. या लोकांनी मोहावर नियंत्रण ठेवत राहावे.

ह्या तिन्ही राशींच्या लोकांनी विष्णूगणपतीची उपासना रोज करावी:

१०८ वेळा जप करणे आवश्यक आहे. ही उपासना संध्याकाळी ५.३० ते रात्री १०.३० दरम्यान करावी. उपासनेच्या वेळी तोंड पश्चिमेकडे असावे.

तसेच द्वारकापैठण ह्या धामांची यात्रा जीवनात एकदा तरी करावी. यामुळे चित्त स्थिर होते, मन शांत होते व उत्साह वाढतो.

संत एकनाथ महाराज हे युगपुरुष होते. त्यांचे सर्व कार्य जलतत्त्वाशी संबंधित होते. युगपुरुषांचे महत्त्व हे युगानुयुगे प्रभावी राहते.

भगवान श्रीकृष्णाच्या तत्त्वज्ञानाचा अवलंब करावा.

मीन, वृश्चिक व कर्क राशीचे लोक हे चतुर्वर्णांपैकी ब्राह्मण वर्णाचे असतात. ही माणसे सत्त्वगुणी व कफ प्रकृतीची असतात. त्यामुळे कफदायी पदार्थ टाळावेत.

जलतत्त्वाचे निजतत्त्व विवेक असल्यामुळे ते ह्या राशींच्या स्वभावात खोलवर भिनलेले असते.

यांचा संबंध व्यवहाराशी आहे. हे लोक व्यवहारतज्ज्ञ असतात. यांना व्यावसायिक उलाढाल, व्यवहार हा सहज साध्य होतो. यांना लोभ व द्वेषावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

प्रत्येक राशीचा स्वतंत्र विचार

१०) मीन रास:

मीन राशीच्या लोकांनी औदुंबराखाली पहाटे ४ ते ६ पश्चिमेकडे तोंड करून खालील मंत्र जप करावा (१०८ वेळा):

११) वृश्चिक रास:

पूर्वेकडे तोंड करून पहाटे ३ ते ५ खालील मंत्र म्हणावेत:

१२) कर्क रास:

उत्तर दिशेला तोंड करून रात्री १०.३०–१२.३० या काळात जप:

सारांश

मीन, वृश्चिक व कर्क राशीच्या लोकांनी संध्याकाळी ५.३० ते रात्री १०.३० पश्चिमेकडे तोंड करून विष्णू, गणपती व आराध्य देवतेच्या मंत्रांचा जप करावा.

अधिक माहितीसाठी हा खेळ प्राक्तनचा की पूर्व संचितांचा हे पुस्तक प्राप्त करून घ्यावे.