नाथशक्तिपीठाने प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या कृपा व मार्गदर्शनात गुरूकुल पध्दतीचा ओघ सतत प्रवाहित ठेवला आहे. अशा सिध्द, व्यापक, व समाजोपयोगी कार्याला मी विनम्रपणे अभिवादन करतो.
मनुष्याची कार्यक्षमता वाढविणे, त्याला सकारात्मक बनविणे व जीवनात भौतिक सुख समृध्दी प्रदान करणे व त्याच वेळी त्याच्या आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग मोकळा करणे असे सर्वांगीण कार्य नरेंद्र नाथांचे आहे.
नरेंद्रनाथांच्या नाथपंथ कार्याची, वेद कार्याची व वेदमंत्राच्या माध्यमातून होणार्या ‘भाग्याच्या पुनरुज्जीवनाची’ अनुभूतीपूर्ण परीक्षण केले असता असे दिसते की गेल्या १५० वर्षा मधे अशी अनुभुती कुणालाहि घेता आली नाही.
पंडित वसंतराव गाडगीळ म्हणतात की जोपर्यंत नरेंद्रनाथ महाराजांसारखे महापुरुष या परंपरेचे नेतृत्व करत आहेत, तोपर्यंत भारतीय संस्कृती आणि सनातन धर्माचा प्रकाश कधीही मंदावणार नाही.
डॉ. खांडेकर यांच्या मते गुरूंचे मार्गदर्शन हे बुद्धीला अधिक धारदार बनवते. आयुष्याच्या प्रवासात जेव्हा तर्क संपतो, तिथे सद्गुरूंची दृष्टी आपल्याला योग्य दिशा (GPS) दाखवते,