गुरुचरित्रातल्या अनुभूती आजही येतात
गुरुचरित्र म्हंटल म्हणजे दत्त जयंती आठवते. दत्त चरित्र, सप्ताहात वाचले जाते व गुरु चरित्र सप्ताहात होणारी दत्ताची उपासना आठवते. गुरुचरित्राची पोथी पाहिली की त्याच्यावर भगवान दत्तात्रेयांचा चित्र पाहून दत्तात्रेयांचे स्मरण होतं आणि आपण गुरुचरित्र वाचायला सुरुवात करतो. गुरुचरित्र वाचतांना विशिष्ट वातावरणात राहून म्हणजे खाण्यापिण्याचे बंधन सप्ताहात आपल्या वावरणा-यावरची बंधन आणि पोथी मध्ये दिलेले बंधन हे सांभाळत आपण गुरुचरित्राचा सप्ताह पार पाडीत असतो. त्यावेळेला घरातले वातावरण देखिल शुद्ध आणि पवित्र झाल्यासारखे वाटते. एका वेगळ्याच मनातल्या वातावरणात आपण वावरत असतो. प्रत्यक्ष गुरुचरित्र वाचत असताना भगवान दत्तात्रयांनी तीन प्रकारचे अवतार धारण केले, एक नृसिंह सरस्वती दुसरा श्रीपाद श्रीवल्लभ आणि तिसरा दत्तात्रेय. या अवतारांचा उल्लेख कथानकातून गुंफला गेला आहे आणि पोथी वाचता वाचता नकळत आपण त्या कथानकामध्ये रमून जातो आणि पुढे वाचत राहतो. बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की आपण कोणत्यातरी नादामध्ये वाचन करत आहोत आणि आपण त्या नादातच राहतो. आपल्याला उपलब्ध वेळेत प्रत्येक दिवसाचं वाचन संपवण्याचा आपला प्रयत्न असतो हे करत असतांना त्या पोथी मध्ये काय सांगितले आहे यांच्याकडे लक्ष राहत नाही आणि कथानक जस समजेल तस ते समजून त्या दिवसाच वाचन पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित राहत. वस्तुतः संपूर्ण गुरुचरित्र हे भगवान दत्तात्रेयांनी सांगितलेलं आहे परंतु ब्रह्मा-विष्णू-महेश रुपी भगवान दत्तात्रेय आपल्याशी संवाद करत आहेत किंवा आपल्याला हे गुरुचरित्र सांगत आहेत किंवा गुरुचरित्राच्या माध्यमातून आपले जीवन सुरळीत सुखावह करण्याचा ते प्रयत्न करीत आहे याचे आपल्याला भान देखील राहत नाही. पोथी मध्ये श्रीगुरुंनी, गुरुस्वामी, गुरूंनी अशाप्रकारे भगवान दत्तात्रय यांना संबोधले आहे. त्यामुळे वाचतांना आपलं अंतर्मन भगवान दत्त यांच्या चरित्र वाचनात गुंतलेला असलं तरीही बुद्धीच्या कसावर ते गुरु या संज्ञेतच अडकलेल राहत. म्हणजे अंतर्मनाला हि जाणीव होतच नाही की प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेय आपल्याशी संवाद साधत आहेत. आपण गुरु म्हणजे सद्गुरु म्हणजे सद्गुरूंचा कार्य करणारी व्यक्ती अशा विचारसरणीत नकळत गुंतून राहतो आणि सद्गुरु वेगळे भगवान दत्तात्रय वेगळे अशी भूमिका मनामध्ये निर्माण होते. वास्तविक पाहता चरित्राच्या प्रत्येक अध्याय मध्ये श्री गुरु सांगतात, असे स्पष्टपणे सांगितले आहे. म्हणजे प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेय सांगतात तेच समोर आहेत त्यांच्याशीच आपला संबंध आहे त्यांचेच चरित्र त्यांच्यासमोर आपण वाचत आहोत ही मनाची भूमिका स्पष्टपणे राहत नाही त्यामुळे गुरुचरित्र वाचन झाल्यावर आपण भगवान दत्तात्रेय यांच्या सानिध्यात होतो ते प्रत्यक्ष तिथे होते, तेच आपल्याला सांगत होते अशा प्रकारची आपली भूमिका राहत नाही. गुरुचरित्र म्हणजे अदृश्य देवासमोर आपण वाचलेली पोथी ही आपली भूमिका राहते. देव आणि गुरु किंवा देव आणि भगवान दत्तात्रेय हे वेगळे आहेत आणि भगवान दत्तात्रेय हे गुरु स्वरूपाने देह धारण केलेल्या सद्गुरूंच्या माध्यमातून आपल्यासमोर उपस्थित आहेत ही जाणीव आपल्याला ठेवणे अवघड जाते आपण आपल्या विचारांच्या ताणात राहून बुद्धीच्या कसावर हे मनात राहतो हे आपण गुरुचरित्र वाचत आहे अशा भावनेने अंतर्मनाने त्यांच्याशी समरस होऊन आपण वाचन करीत नसून आपल्याला हे वाचन करायचं आहे हे नियमित वाचन नियमित स्वरूपात ठराविक अध्यायच वाचन ठराविक पद्धतीने राहणे एवढेच काय ते मनात राहते भगवान दत्तात्रेय हे स्मर्तृगामी आहेत केवळ त्यांच्या स्मरण मात्रा ने म्हणजे मनामध्ये दत्त म्हटल्याने किंवा विचार आल्याने ते प्रत्यक्षपणे समोर असतात हा त्यांचा मूळ स्वभाव व हे त्यांचे मूळ रूप आहे आहे. भक्त किंवा अभक्त या कोणीही त्यांचे केवळ स्मरण केले तरी ते प्रत्यक्षपणे समोर उभे असतात ते सर्वत्र व्यापी आहेत, हेच त्यांचे स्वाभाविक चरित्र आहे. हे ज्यांचे वैशिष्ट्य आहे त्या भगवान दत्तात्रय यांचे चरित्र वाचताना ते समोर नाहीत तिथे हजर नाहीत ही कल्पना करून वावरणे हे केवळ आपले अज्ञान आहे आपण आपली भावना विचार याप्रमाणे करून गुरुचरित्राचे वाचन करायला हवं म्हणजे आपल्याला त्यांच्या अनुभूती येऊन आपल्यात स्थित्यंतर घडून लागेल. नुसते चरित्र वाचतच गेले व भावनेत आणि आपल्या यांच्याशी असलेल्या संबंधाचा विचार न करता राहिलं तर होता होता केव्हातरी कोणत्यातरी जन्मात आपल्यात स्थित्यंतर झालेले दिसेल व आपल्याला सद्गुरूंचा लाभ होऊन आपली उन्नती सुरू होईल. गुरुचरित्र वाचनामुळे अथवा भगवान दत्तात्रेयांच्या उपासनेमुळे आपल्याला गुरुंचा लाभ होऊ शकतो लाभलेले गुरु हे भगवान दत्तात्रेयांचे स्वरूप आहे याची अनुभूती येऊ लागते कोणतेही गुरु आणि कोणाचे गुरु हे भगवान दत्तात्रेयांचे स्वरूप आहे ही जाणीव सदैव असावी हल्लीच्या वातावरणात समाजामध्ये अनेक प्रकारचे गुरु कार्य करीत आहेत हे सर्वच गुरु भगवान दत्तात्रेयांचे स्वरूप आहेत. प्रत्येक शिष्याला सात्विक आणि भावनिक कसोटी राहून त्यांची ओळख पटवून घ्यावी लागते. जोपर्यंत आपण गुरूंच्या कसोटीवर उतरत नाही तोपर्यंत आपण गुरूंशी समरस होऊ शकत नाही. जोपर्यंत गुरुंशी समरस होत नाही तोपर्यंत आपली प्रगती होऊ शकत नाही. आपला व्यवहार आणि गुरूंशी असलेला संबंध आपल्याला सदैव मार्गदर्शन करीत असतो. गुरु हे अखंड परंपरेने कार्य करणारे नसले तर त्यांचा व्यवहार आणि अंतरात्म्याची असलेले संबंध हे प्रत्येकाला या गोष्टींची जाणीव देत असतात. अशाही गुरूंशी जर आपण समरस झालो तर आपली प्रगती ही निश्चित आहे. परंतु त्यासाठी आपल्याला भक्त प्रल्हाद सारखे सचोटीवर उतरावे लागते. अखंड गुरु परंपरेने कार्य करणारे गुरू लाभले तर त्याची अनुभूती पदोपदी येऊ लागते परंतु आपलीच बुद्धी आपल्याला भ्रष्ट करीत असते त्यामुळे आपली प्रगती होत नाही. तसेच आपल्या गुरुबंधू च्या प्रगतीवर आपल्याला तऱ्हेचे प्रश्न पडतात आणि आपण तिथे देखील स्वतःलाच गुरूं पासून दूर सारतो गुरुचरित्रातील भगवान दत्तात्रेय काय किंवा अखंड गुरुपरंपरा असणारे गुरु कार्य करणारे काय,कोणतेही गुरु पहा मुळात ते देहधारी असल्यामुळे आपल्या अंतर्मनातून आपल्याला त्यांच्या बद्दलच्या अनेक प्रकारच्या शंका येतच राहतात. त्या आपण कधी व्यक्त करतो तर कधी करत नाही परंतु गुरु ही व्यक्ती माझ्या सारखीच देहधारी आहे हा विचार आपल्याला आत्मोन्नती पासून दूर नेतो. जो गुरुंशी समरस होतो तो आपली प्रगती करत करत गुरु कृपा प्राप्त करून गुरुपदी जाऊन पोहोचतो गुरुचरित्र वाचतांना बऱ्याच वेळा मनात शंका येतात परंतु आपण त्याचे निरसन करून घेत नाही परंतु सद्गुरु आपली ओळख पदोपदी देत असतात व्यंकटनाथ महाराज हे, भगवान दत्तात्रेयांचे शिष्य मच्छिंद्रनाथ यांच्यापासून अखंड गुरु परंपरेने कार्य करणारे पंधरावे नाथ होते वागण्यात अतिशय सहजता, सामान्यांसारखी राहणी, परंतु सामर्थ्य हे प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयां सारखे. बोलता-बोलता सहजतेने व्यावहारिक भूमिकेतून जीवनाचे मार्गदर्शन करणार आणि आत्मोन्नतीचा मार्ग दाखवणार. त्याच बरोबर आपल्या सामर्थ्याची आणि शिष्याच्या अवस्थेची कल्पना कृतीतून देणार व्यंकटनाथ महाराज एकदा नरेंद्राच्या घरी वास्तव्याला होते. तसे त्यांचे शरीर थकलेले होते वृद्धापकाळ होता उठतांना आधार घेऊन उठावे लागेल अशी त्यांची शारीरिक परिस्थिती होती. सकाळी गादीतून उठताना त्यांनी नरेंद्रला म्हटले हात दे म्हणजे जमिनीवरून उठायला सोपे जाईल . नरेंद्रने उठण्यासाठी हात दिला परंतु त्याच्या मनातील भावना ही की आपल्याला भरभक्कम पणे उभे राहून हात देऊन त्यांना उठायचे त्यांना उठायला त्रास होतो या भूमिकेतून त्यांना उचलायचे या विचारांनी महाराजांना हात देऊन उठवण्याचा प्रयत्न केला महाराजांचा नुसता हात धरला उठवण्यासाठी, हे त्यांच्या लक्षात आले व शिष्याला जाणीव देण्यासाठी, जाणीव देऊन शिकवण्यासाठी ते म्हणाले अरे बापरे, एवढा तुझ्यात जोर आहे तर मग तू सहज मला उठवशील . उठव बरं असे म्हणून मांडी घालून बसून राहिले नरेंद्रने खूप जोर लावला पण त्यांची मांडणी हल्लीच नाही. ते म्हणाले काय झाले रे ,उठवता येत नाही. तू अजून दोघा-तिघांना बोलाव चार-पाच जण मिळून त्यांना उठण्याचा प्रयत्न केला पण ते तसूभर देखील हलले नाही शेवटी सगळ्यांनी त्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला तेव्हा ते नरेंद्रला म्हणाले नुसता हात दे जोर लावू नको आणि साधा हात दिला आणि ते इतक्या सहजतेने पटकन उठले की हे जाणवले की हात देणे हे केवळ नाममात्र होते व्यंकटनाथ महाराज पुण्याला असतांना चार-पाच जण सकाळीच त्यांच्या दर्शनासाठी आले घरातील एजमान हे सहज अवस्थेत म्हणजे पायजमा आणि बनियानवरच महारांजा समोर बसले होते आणि चौघेजण बाहेरून आले होते तेही सहज बसले होते . हे सर्वजण एका सतरंजीवर बसले होते बोलण्याच्या ओघात महाराजांची ते योगीक क्रिया बद्दल बोलत होते आणि बोलता बोलता सहज म्हणाले महाराजांना म्हणाले महाराज पुराणात आम्ही वाचला आहे की योगसामर्थ्याने भक्ताला सहज त्यांना पाहिजे तेथे नेले गुरुचरित्राच्या 43 आध्यात गुरूंनी विणकराला मल्लिकार्जूनाच्या दर्शनासाठी योगसामर्थ्याने नेले आणि तेथील त्याचा व्यवहार संपल्यावर त्याच पद्धतीने त्याला ते परत घेऊन आले. खूप मोठे अंतर क्षणार्धात त्यांनी पार केले आणि त्याच प्रमाणे परत आले. हे आज शक्य आहे का त्यावर महाराज हो शक्य आहे असे अत्यंत सहजपणे म्हणाले. मग महाराज त्यांच्या सारखे आम्हाला घेऊन जाऊ शकता का? महाराज म्हणाले तुमच्या मनात विकल्प आहे म्हणून आम्ही तुम्हाला घेऊन जातो पण जेथे तुम्हाला सोडू तेथून तुम्हाला तुमच्या प्रयत्नांनी परत यावे लागेल सगळ्यांना असे वाटले की महाराज गंमत करत आहेत इतक्या सहजतेने महाराजांनी सांगितले. महाराज म्हणाले तुम्ही जिथे आहात तिथेच मांडी घालून बसा आणि डोळे बंद करा डोळे उघडू नका आम्ही सांगू तेंव्हा डोळे उघडा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सर्वांनी तसेच केले आणि लगेच महाराज डोळे उघडा म्हणाले. घडले असे की पाच जण होते त्याच परिस्थितीत ते पाच निरनिराळ्या ठिकाणी उभे होते आणि कुठल्यातरी शेताच्या मध्ये उभे होते. आपण कुठे आहोत हे कळायला त्यांना काही मार्गच नव्हता. तिथून मेन रोडवर येऊन कोणीतरी भेटेल त्याला विचारून आपण कोठे आहोत त्याप्रमाणे घरी परत जाण्याचा प्रयत्न करता येईल म्हणून होते त्याच परिस्थितीत रस्त्यावर कसेबसे पोहोचले . ते सर्व जण निरनिराळ्या ठिकाणी होते. जवळ जवळ वीस किलोमीटर दूर अंतरावर सर्वजण होते खिशात पैसे नाही आणि आता घर गाठायचे म्हणून हर तऱ्हेचे प्रयत्न करून वाहन धारकांच्या साह्याने ते सर्व पाच सहा तासानंतर घरी पोहोचले. महाराजांचे दर्शन घेतल्यावर ते म्हणाले आमच्या मनात विकल्प होता तुमची परीक्षा पाहण्यासाठी आम्ही असे बोललो होतो परंतु आता आम्हाला प्रचिती आली आहे आपण मला क्षमा करा महाराजांनी सर्वांना आशीर्वाद दिला याप्रमाणे सामान्य माणसाला देखील योगी आपल्या साधनेने क्षणार्धात कोठेही नेऊ शकतात ही अनुभूती आली गुरुचरित्रा जे सांगितले ते आजही घडत आहे. आपला अशा गुरूंशी संपर्क येणे आणि त्यांची कृपा संपादन करणे हा योग साधा तर हे शक्य आहे आपल्या गुरूंशी समरस होऊन गुरुचरित्राचे पठण शुद्ध भावनेने व प्रत्यक्ष गुरूंच्या सान्निध्यात आपण आहोत या भूमिकेतून पाठ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करीत राहावा. सर्वकाही आपोआप घडेल.