हिमालयातील अनुभव
✦ अनसूया-आश्रमातील अनुभव
अनसूया आश्रम हिमालयात आहे—याच ठिकाणी त्रिदेवांनी अनसूयेची परीक्षा घेतली आणि भगवान दत्तात्रेयांनी अवतार धारण केला.
नाथशक्तिपीठातील नरेंद्रनाथ आणि त्याचे शिष्य आणि २५ विद्यार्थी— सर्वजण अनसूया आश्रमात गेले होते. जवळच अत्रीमुनींचा आश्रम आहे. ते तिथे एक महिना राहून साधना आणि अनुष्ठान करीत होते.
तेथे अनेकांना गूढ अनुभूती मिळाल्या.
नाथपंथाच्या परंपरेनुसार दोन वेळा हवन केले. तेथील काही वेचक अनुभव.
✦ “गिरती बरसात रोकेंगे नरेंद्रनाथ महाराज”
अत्रीमुनींच्या गुहेकडे जाणे अत्यंत कठीण—
- वाटेत नदी — कंबरेभर बर्फाचे पाणी - पुढे १०–१२ फुटी सरळ दगडी भिंत — साखळी धरून चढावे लागते - नंतर अडीच फुटी तिरपी दगडी कपार — पंधरा फुटांची - घसरले तर सरळ हजार फुट खोल दरी - मग अरुंद पायवाट - आणि विशाल अत्रीमुनींची गुहा—हजार माणसे बसू शकतील अशी
पुढे ‘C’ आकाराचा अरुंद मार्ग आणि वरून पाण्याचा धबधबा.
ह्या पवित्र आत्रिमूनी आश्रमात नरेंद्रनाथ महाराजांनी साधना केली.
दुसरे हवन सुरू होण्यापूर्वी स्थानिक लोक नरेंद्रनाथ ह्यांना विचारू लागले “महाराजजी, इस बार भी बरसात रुकेगी क्या?”
नरेंद्रनाथ म्हणाले “नहीं - इस बार बरसात आयेगी… लेकिन जब बरसात का पानी हमारे यज्ञकुंड में गिरेगा, तब हम उसे रोक देंगे.”
ही बातमी स्थानिक वृत्तपत्रात मथळा बनली— “गिरती बरसात रोकेंगे नरेंद्रनाथ महाराज।”
चमत्कार पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोक अनसूया मंदिराकडे धावले. घोडे, कंड्या—ज्यांना चढता येत नव्हते तेही आले.
✦ हवन सुरू झाले
पहिल्या हवनानंतर झालेल्या गारपिटीने ताडपत्री फाटली होती. ती दुरुस्त करून हवन सुरू झाले. फॉरेनर्ससुद्धा कॅमेरे घेऊन आले होते.
पाऊस सुरू झाला—नंतर वाढला. पाण्याची धार सरळ यज्ञकुंडात पडत होती. हवन विझेल असे सर्वांना वाटत होते.
तेव्हा नरेंद्रनाथ महाराजांनी कुंडातील गरम विभूती आकाशाकडे फेकली आणि हाताने एका दिशेला इशारा केला.
क्षणात— पावसाची धार बाजूला सरकली! कुंडावर एक थेंबही न पडता पाऊस शेजारच्या पर्वतावर पडू लागला.
सर्वजण थक्क.
पुजाऱ्याच्या डोळ्यांत अश्रू— “महाराजजी, आप तो परमेश्वर हैं… आज प्रत्यक्ष अनुभव मिला है.”
✦ पूर्णाहुतीनंतर
तेथील ३५ घरांनी प्रथमच एकत्र भंडारा केला. सर्वांचा एकोपा पाहून लोक चकित—जगातील आठवे आश्चर्य!
राम बाबा म्हणाले
“महाराजजी, व्यंकटनाथ महाराज का मंदिर यहाँ बनाइये.”
एका साधूंनी तर आपला आश्रम देण्याची तयारी केली.
दिल्लीचे लोकसभा स्पीकर बालास्वामीही उपस्थित होते.
निघताना सर्व लोक रडत होते— जसे कृष्णप्रस्थानावेळी गोकुळवासी रडले.
राम बाबा म्हणाले :
“अनसूया माता ने कहा है—आने वाले समय में आप ऐसा भवन बनायेंगे जिसकी दुनिया में मिसाल नहीं होगी. देव–देवता वहाँ निवास करेंगे.”
त्यांनी सिद्ध वनस्पती दिल्या.
नाथशक्तिपीठाची स्थापना या घटनेनंतर तीन वर्षांनी झाली.
नंतर हिमालयातील एक सिद्ध पुरुष— नरेंद्रनाथ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी—अकोल्याला आले.
दत्तात्रेयांच्या जन्मभूमीत मिळालेल्या अनुभूती आजही सर्वांच्या मनात घुमतात.