फलदायी उपासना
तीन प्रकारची उपासना केल्यास माणसाच्या भौतिक जीवनात आमूलाग्र फरक पडतो:
- (१) श्री विष्णूची उपासना
- (२) नव ग्रहांची उपासना
- (३) यज्ञ संस्कार
श्री विष्णूची उपासना
जन्मदत्त, अनुवंशिक, दीर्घकालीन, अकारण उद्भवलेल्या प्राकृतिक दोषांचे निराकरण करण्याकरीता तसेच वंशपरंपरागत आलेल्या रोगांसाठी, गंभीर रोगांसाठी, प्रकृती अस्वास्थ्यासाठी या उपचाराचे प्रयोजन केलेले आहे.
अनुवंशिक रोग, दीर्घकाळ टिकणारे रोग, कारण नसताना पाठीमागे लागलेल्या व्याधी — यासाठी श्रीनाथशक्तिपीठाने ही विशेष योजना केली आहे. जन्मतः शरीरात निर्माण झालेली व्याधी, कर्माअभावी निर्माण झालेले व्यंग वा दोष, जीवनातील अनुत्साह व नकारात्मक विचार दूर करण्यासाठीही हे उपचार केले जातात.
बुद्धिमत्तेचा विकास कमी असणे, मनातील निरुत्साह, शिक्षणातील अडचणी, परीक्षा काळात आजारपण, नियंत्रणात न राहणारी झोप, अयोग्य पद्धतीने होणाऱ्या शारीरिक पीडा — हे प्रश्नही या पूजेद्वारे हाताळले जातात.
चिडचिडेपणा, अस्थिर स्वभाव, मनाची अशांतता घालविण्यासाठीही हे उपचार होतात. करणी–बाधा आदी प्रकारांनी त्रस्त जीवासाठी नाथशक्तिपीठाने विशेष योजना केली आहे. या पूजेचा परिणाम सर्वांगिण विकासावर होतो.
आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहणे, प्रगती करणे, आर्थिक विवंचना, ऋण, वैमनस्य, दैनंदिन जीवनातील कुयोग — या सर्वांतही ही उपासना उपकारक आहे.
या उपचारांमुळे परयंत्र, परमंत्र, परतंत्र, भूत–प्रेत भय, जारण–मारण यांपासून संरक्षण मिळते. हा प्रयोग प्रातिनिधिक स्वरूपात करता येत नाही. ज्याच्यावर उपचार करायचे आहेत त्याच व्यक्तीसाठीच हा परिणामकारक असतो.
नव ग्रहांची उपासना
तीथी, वार, नक्षत्र व अग्नी यांच्या विशेष योगानुसार, विशिष्ट नक्षत्राला हा उपचार केला जातो. जीवनातील विविध अडसर दूर करण्यासाठी हा उपाय केला जातो.
धक्कादायक किंवा क्लेशदायक घटना घडविणाऱ्या कर्मदोषांच्या निवारणासाठी हा उपचार आवश्यक आहे. हा उपचार धर्म–जात निरपेक्ष असून कोणत्याही धर्मातील व्यक्तीला करता येतो.
कारण — कर्मदोषाचा संबंध धर्म, जात, पद्धती यांच्याशी नसून *त्या व्यक्तीच्या पिंड, कर्म आणि स्थितीशी* असतो.
या उपचारानंतर मनातील उत्साह वाढतो, योगांमध्ये परिवर्तन जाणवते व भाग्यात सुधारणा होऊ लागते.
यज्ञ संस्कार
व्यक्तिगत व कौटुंबिक समस्यांसाठी हा संस्कार करतात. याचा संकल्प ज्याचा त्यानेच करावा लागतो. अल्पवयीन मुलांसाठी आई–वडील संकल्प करू शकतात, परंतु फळ संकल्पकर्त्यासच मिळते.
कुटुंब सामील असल्यास फळ संपूर्ण कुटुंबाला मिळू शकते.
हा कार्यक्रम यजमानाच्या घरी, इच्छेनुसार इतरत्र किंवा श्रीनाथशक्तिपीठ येथेच केला जातो. यजमानाच्या असाध्य समस्या, इच्छा, कौटुंबिक वाद, मानसिक त्रास यासाठी हा संस्कार केला जातो.
घरातील अस्थिरता, पती–पत्नीमध्ये वाद–मतभेद, कलुषितपणा वाढत असल्यासही हा उपाय उपयुक्त आहे.
या उपाययोजनेनंतर संकल्पपूर्तीची जाणीव यजमानाला होते — अडचणी हलक्या होतात, सुसंवाद वाढतो व शांतता–स्थैर्य अनुभवास येते.