श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

भेट दिलेली पृष्ठे: आत्मोन्नती साधना

आत्मोन्नती साधना

आत्मोन्नती साधना म्हणजे स्वतःच्या अंतर्मनाचा विकास साधण्यासाठी केलेला सातत्यपूर्ण आणि जागरूक प्रयत्न होय. या साधनेत आत्मपरीक्षण, संयम, शिस्त आणि गुरुकृपेच्या आधारे अहंकाराचे क्षालन करून विवेक जागृत केला जातो. आत्मोन्नती साधनेचा उद्देश बाह्य यशापेक्षा अंतर्गत स्थैर्य, शांती आणि आत्मबोध प्राप्त करणे हा आहे. जीवनातील आव्हानांना सकारात्मक दृष्टीने सामोरे जाण्याची क्षमता या साधनेतून विकसित होते.



मागे मुख्य विभागाकडे जाण्यासाठी



ह्या आत्मोन्नती साधना विभागाअंतर्गत खालील लेख आपण वाचू शकता.



शीर्षकसंक्षिप्त विषयलेखक
आत्मोन्नती साधना ७सद्गुरू कृपा, नामस्मरण व तपश्चर्येद्वारे अज्ञान दूर होऊन मन, बुद्धी व इंद्रियांचे शुद्धीकरण साधणारी आत्मोन्नतीची आध्यात्मिक प्रक्रिया.नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ
आत्मोन्नती साधना ६आत्मोन्नती साधना ६ मध्ये स्वधर्म, पंचमहाभूत, सद्गुरूंची सार्वभौम सत्ता व ईश्वरी व्यवस्थेशी मानवाच्या विसंगतीचे चिंतन स्पष्ट केले आहे.नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ
आत्मोन्नती साधना ५आत्मोन्नती साधना ५ मध्ये सद्गुरूसेवा, शरीरशुद्धी, पंचमहाभूतांची भूमिका आणि कर्मसंस्कारांद्वारे आत्मोन्नतीचा मार्ग स्पष्ट केला आहे.नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ
आत्मोन्नती साधना ४आत्मोन्नती साधना कर्म, शरीरशुद्धी, सद्गुरूकृपा आणि ब्रह्मांडतत्त्व यांच्या माध्यमातून आत्मा उन्नतीचा मार्ग स्पष्ट करते.नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ
आत्मोन्नती साधना ३आत्मोन्नती साधना कलियुगातील जीवासाठी नाथपंथ, विवेक, सूर्योपासना आणि मनुष्यदेहाच्या महत्त्वातून आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग स्पष्ट करते.नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ
आत्मोन्नती साधना २आत्मोन्नती साधना अहंकारनाश, विवेकजागृती, आत्मज्ञान आणि सद्गुरूअनुग्रहाद्वारे जीवाच्या आध्यात्मिक उन्नतीचा स्पष्ट मार्ग दर्शवते.नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ
आत्मोन्नती साधना १आत्मोन्नती साधनेत ब्रह्मांडतत्त्व, जीव–शिव मिलन, सद्गुरूअनुग्रह आणि विवेकजागृतीद्वारे मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीचे सुलभ मार्गदर्शन.नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ
आत्मोन्नती उपासना प्रास्तावीकसात वारांच्या उपासनेद्वारे आत्मोन्नती, आत्मज्ञान आणि सद्गुरूंच्या कृपेने जीवनातील बदल कसा साधता येतो याचे सरळ व सुलभ मार्गदर्शन.नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ
CSV Export

आत्मोन्नती साधना

आत्मोन्नतीची आवश्यकता

अध्यात्म हा अत्यंत कठीण विषय आहे, असा समज जवळजवळ सर्वांचाच असतो. कोणताही विषय आपल्याला कठीण वाटण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या विषयाचे स्पष्ट ज्ञान दिले जात नाही किंवा आपण ते मनोपूर्वक ग्रहण करत नाही.

मानवाच्या मनाची क्षमता अपरिमित आहे. मनापासून एखादा विषय समजून घेतला, त्याचे चिंतन-मनन केले, त्याचे प्रात्यक्षिक करून पाहिले, तर तो अगदी सहज समजतो. हे कोणत्याही गोष्टीला लागू आहे. जर हे काहीच झाले नाही, तर तो विषय आपल्याला कठीणच वाटणार!

ज्याला अध्यात्म समजून घ्यायचे आहे, त्याने ते ज्याच्याकडून समजून घ्यायचे आहे, त्याच्या पद्धतीनेच समजून घेणे आवश्यक आहे. आपली स्वतःची पद्धत, आपलीच चौकट सोडावी लागते. ज्ञानार्जनात हट्ट धरायचा नसतो. शिकवणारा ज्या पद्धतीने शिकवतो, त्याला आपण स्वतःला अनुरूप केले तर विषय सहज उलगडतो.

शुद्ध अंतःकरण, प्रांजळ मन, स्वच्छ बुद्धी आणि पवित्र हेतू ठेवून एखादा विषय समजण्याचा प्रयत्न केला तर तो कितीही अवघड असला तरी समजतो. आणि एकदा समजला की अत्यंत सोपा वाटतो. जशी कोरी पाटी असते, तशी कोऱ्या मनाने ज्ञानार्जन करावे.

अध्यात्मिक पात्रता

ज्या साधुसंतांनी, सत्पुरुषांनी अध्यात्मात प्रचंड उंची गाठली त्यांचा अभ्यास केला तर कळते की अध्यात्मिक साधनेसाठी कोणत्याही शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणाची आवश्यकता नाही. फार काय—लिहिता किंवा वाचता येणेही अनिवार्य नाही. अध्यात्मामध्ये भौतिक ज्ञानाची कसोटी नसतेच.

संपूर्ण खेळ हा शुद्ध, प्रांजळ, सात्विक मनाचा, चित्ताच्या वृत्ती-प्रवृत्तींचा आणि सदाचारी जीवनशैलीचा आहे.

कलियुगातील जीवनपद्धतीत भोळाभाबडा, प्रामाणिक भाविक जीव उरलेलाच नाही. तो पुन्हा जागवण्यासाठी उपासना, साधना आणि विविध आध्यात्मिक प्रयत्न आवश्यक आहेत. आत्मिक उन्नती हा जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. जीवनात काही करा वा न करा — आत्मोन्नती झालीच पाहिजे; म्हणजेच जन्मजन्मांतरांची जीवनशृंखला उन्नत होत राहून शेवटी जीवाचा उद्धार व्हावा.

आत्मोन्नतीचे दोन मार्ग

यासाठी दोन मार्ग आहेत :

  • राशी-पद्धतीप्रमाणे उपासना करणे
  • किंवा सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जीवाची उन्नती करणे

जीवाच्या उन्नतीचा आणि जपतप-साधनांचा थेट संबंध आहे, असे नाही. तो एक मार्ग आहे; परंतु जपतप, मंत्र, कठीण साधना न करता देखील अध्यात्मिक उन्नती साधता येते.

यासाठी दुसऱ्या प्रकारची साधना म्हणजे सप्तवाराची उपासना, ज्याबद्दल आपण येथे वाचू शकता.