श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

आत्मोन्नती साधना

१. ऐसी कळवळ्याची जाती। करी लाभावीण प्रीती।

प. पू. नाथशक्तिपीठाधीश श्री नरेंद्रनाथ महाराज विरचित *आत्मोन्नती साधना* याचे लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर प्रकाशन झाले. हा प्रकाशन सोहळा आम्हा सर्व जीवांसाठी अविवेकाची काजळी फेडून ज्ञानाची दिवाळी साजरी करणारा ठरला.

आत्मोन्नती साधनेच्या पुरश्चरणाने साधकाचे जीवन नऊ दीपांच्या लख्ख प्रकाशाने उजळून निघते.

आत्मोन्नतीतील नऊ दीप

पहिला दीप — श्री सद्गुरूंच्या कृपाप्रसादाचा साधकाच्या जीवनात गुरुकृपा ही प्रथम आणि मूलभूत प्रकाशज्योत होते.

दुसरा दीप — ब्रह्मा-विष्णू-महेशाची कृपा त्रिमूर्तींच्या अनुग्रहामुळे साधनेचा मार्ग सुरक्षित आणि तेजस्वी होतो.

तिसरा दीप — विवेकाची ज्योत जीवनातील योग्य-अयोग्य ओळखण्याची क्षमता जागृत होते.

चौथा दीप — पंचमहाभूतांच्या अनुकूलतेचा निसर्गातील पाचही तत्त्वे साधकाच्या प्रगतीस पोषक बनतात.

पाचवा दीप — ग्रहयोगांच्या साह्याचा जीवनात अडथळे निर्माण करणारे ग्रहयोग शांत होतात आणि अनुकूलता प्राप्त होते.

सहावा दीप — परमार्थ उन्नतीचा साधक आत्मोन्नतीच्या दिशेने स्थिरपणे वाटचाल करू लागतो.

सातवा दीप — सुख-संतोषमय आयुष्याचा जीवनातील दुःख, क्लेश आणि अस्थिरता कमी होऊन प्रसन्नता वाढते.

आठवा दीप — जीवनाचा अर्थ समजविणारा जीवनाचे उद्दिष्ट, ध्येय आणि परमार्थ यांचे आकलन स्पष्ट होते.

नववा दीप — देहशुद्धीद्वारे आत्मोन्नतीची वाट मोकळी करणारा शरीर, अंतःकरण आणि मन यांची शुद्धी साधकाला उन्नतीचा मार्ग उपलब्ध करून देते.

हीच आत्मोन्नती साधनेची फलश्रुती आहे. सद्गुरू श्री नरेंद्रनाथ महाराज की जय।

विशेष सूचना

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर, शनिवार दि. १४ नोव्हेंबर २० रोजी प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराज विरचित 'आत्मोन्नती साधने' चे प्रकाशन झाले. त्यानिमित्ताने ही सात लेखांची लेखमाला प्रसिद्ध करण्यात आली आहे. आत्मोन्नती साधनेचे पठण रविवारच्या साधनेपासून सुरू करावे.