श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

भेट दिलेली पृष्ठे: वैश्विक परिषदेचे स्थळ

वैश्विक परिषदेचे स्थळ

श्रीनाथशक्तिपीठ : परिषदेचे मुख्य स्थळ

वैश्विक परिषदेचे स्थळ श्रीनाथशक्तिपीठ, खरप रोड, न्यू तापडीया नगराजवळ, अकोला येथे राहिल. ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली, त्याच विधात्यांनी नाथपंथ निर्माण केला आहे. अशा या पंथाचा आध्यात्मिक वारसा नाथशक्तिपीठास लाभला आहे.

नाथशक्तिपीठाच्या स्थापनेपासूनच पिठास नाथपंथाच्या अखंड गुरु परंपरेची कृपा व आशीर्वाद प्राप्त झाले आहेत. हे स्थळ आध्यात्मिक अनुभूतीचे केंद्र असून गेल्या २४ वर्षांपासून येथे आध्यात्मिक विज्ञानावर आधारित अनुसंधान व प्रयोग होत आहेत.

सूर्योपासना ही नाथपंथाचे अधिष्ठान आहे, आणि या वैश्विक परिषदेचा विषयही नैसर्गिकरीत्या सूर्योपासनेचाच आहे.

स्थळाची सोयी आणि पोहोच

श्रीनाथशक्तिपीठाचे अंतर : * रेल्वे स्थानकापासून — ३ कि.मी. * बस स्थानकापासून — ३ कि.मी. * विमानतळापासून — ५ कि.मी.

येथे पोहोचण्यासाठी ऑटो, रिक्षा, टॅक्सी सहज उपलब्ध आहेत. पीठाच्या परिसरात Wi-Fi कनेक्शनसह अन्य सुविधा उपलब्ध आहेत.

अकोल्याची भौगोलिक व हवामान वैशिष्ट्ये

अकोला हे नागपूर–मुंबई जोडणाऱ्या मध्य रेल्वे मार्गावरील तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील महत्त्वाचे जिल्हा ठिकाण आहे. शहराची लोकसंख्या सुमारे २० लाखांपर्यंत पोहोचली आहे.

येथील शिवणी विमानतळ वेगाने विकसित होत असून २०१६ च्या मध्यापर्यंत ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेले असेल.

अकोल्याचे हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३२ ते ४० अंश राहते. परंतु डिसेंबर–जानेवारी महिन्यात वातावरण अत्यंत प्रसन्न राहते आणि तापमान ८ ते २३ अंशांपर्यंत असते.