श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

भेट दिलेली पृष्ठे: सद्गुरूंचा अनुग्रह का घ्यावा

सद्गुरूंचा अनुग्रह का घ्यावा

सद्गुरूंचा अनुग्रह झाल्यानंतर आपल्यामध्ये कसे, काय आणि केव्हा स्थित्यंतर होते, हे आपल्यालाच कळत नाही. आपण तोच आहोत, आपल्या आत काही बदल झाला नाही—असेच वाटत असते.

सभोवतालचे वातावरण, परिस्थिती आणि विचार यांचा परिणाम आपण त्या त्या वातावरणात असताना मनावर होत असतो. जिथे हरिकथा–कीर्तनासारखे कार्यक्रम चालू असतात, त्या वातावरणात मनात तसेच विचार उगवतात. जिथे भांडण, तंटा, हाणामारी सुरू असते, तिथे त्या वातावरणाचा परिणाम मनावर, तसेच आपल्यातील काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या गुणांवर होतो.

हे जसे इतर वातावरणाबद्दल आहे, तसेच सद्गुरूंच्या सहवासात राहिल्यावर त्यांच्या वलयांचा, त्यांच्या सत्त्वगुणांचा परिणाम आपल्यावर नकळत होत असतो.

काम–क्रोध इत्यादी गुणांचा परिणाम आपण त्या वातावरणात असतो तोपर्यंतच टिकतो; तो कायम स्वरूपाचा नसतो. पण आपला पिंड, स्वभाव, मन–विचार हे जर मुळातच तमोगुणी वा रजोगुणी असतील, तर तसे वातावरण त्याच गुणांवर आघात करून आपल्याला सत्त्वगुणांपासून दूर नेते.

परंतु सद्गुरूंच्या सहवासाचा परिणाम याच्या उलट असतो—त्यांच्या सान्निध्यात आपण जितके राहू, तितके आपल्या रजो–तमो गुणांचे क्षय होतात आणि सत्त्वगुण नकळत वाढतात. मन शुद्ध, सात्त्विक आणि प्रांजळ होऊ लागते. ज्या प्रमाणात सत्त्वगुण वाढेल, त्या प्रमाणात साधक घडत जातो. साधक म्हणजे गुरु मार्गी चालणारा शिष्य.

साधकाची इंद्रिये सद्गुरूंच्या सान्निध्यात संवेदनशील होतात आणि समोरची व्यक्ती कोणत्या गुणांची आहे याचे भान त्याला येऊ लागते. जसजशी साधना वाढते, तसतसा त्यातील सत्त्वगुणांचा परिणाम इतरांवरही होऊ लागतो. हा सद्गुरूंच्या सहवासाचा स्थायीभाव आहे.

सद्गुरू सानिध्याने त्त्यांच्या अनुग्रहाने आपला सत्वगुण वाढीस लागून आध्यात्मिक प्रगती होऊ लागते व सरते शेवटी आपण मनुष्य जन्माच्या साध्य म्हणजेच चिरंतर ध्येयाकडे जाऊ लागतो.

मनुष्य जन्माचे ध्येय हे पैसा श्रीमंती किव्वा नाव लौकिक नसून मोक्ष प्राप्ती आहे. आणि मोक्ष प्राप्तीसाठी सदाचार आणि आध्यात्मिक प्रगती आवश्यक आहे.

सद्गुरूंच्या कृपेशिवाय हे शक्य नाही म्हणून सद्गुरू करावे त्याचा अनुग्रह घ्यावा आणि त्यानीं दिलेल्या मार्गाने जीवन व्यतित करावे.

अनुग्रहानंतर शिष्याचे जीवन कसे बदलते?

अनुग्रह ही सुरुवात आहे. त्यानंतर शिष्याच्या जीवनात हळूहळू परिवर्तन घडू लागते— . * श्रद्धा स्थिर होते–गुरुमंत्राचा आधार जीवनात “आतील पकड” निर्माण करतो. . * मनाला एक केंद्र मिळते–पूर्वी मन अनेक गोष्टीत विखुरलेले असते. गुरुमंत्र ते एकत्र आणतो. . * कर्म शुद्ध होते–शिष्य कर्म करतो, पण कर्मात अहंकार आणि फलासक्ती कमी होऊ लागते. . * जीवनात शिस्त येते–साधना, नियम, सेवा, सत्संग — या गोष्टी सहज जीवनात उतरतात. . * अंतःकरणात परिवर्तन घडते–बाहेर काहीही बदलले नाही तरी आतून शांती वाढते.

गुरू उपाय देतात, पण साधना शिष्याला करावी लागते अनुग्रह म्हणजे गुरू “सर्व काही करून देतील” असा अर्थ नाही.

गुरू शिष्याला मार्ग देतात, शक्ती देतात, पण चालायचे शिष्यानेच असते. गुरूंचा संदेश साधा असतो—

  • नामस्मरण कर
  • सत्य बोल
  • संयम ठेव
  • सेवा कर
  • अहंकार कमी कर
  • प्रेम वाढव
  • आणि मनाला परमेश्वराशी जोड

जेव्हा शिष्य या मार्गावर चालतो, तेव्हा गुरुकृपा अधिकाधिक स्पष्ट अनुभवायला लागते.